साऊथ इंडीयन पदार्थ नाश्त्याला खायला सर्वांनाच आवडते. फक्त सकाळच्या नाश्त्यालाच नाही तर दिवसभरात कधीही लोक मेदूवडा, इडली, डोसा हे पदार्थ आवडीने खातात. इडली घरी बनवणं सोपं असतं पण मेदूवडे घरी फारसे बनवले जात नाही. (Why is my medu vada not crispy) घरी मेदूवडे बनवणं अनेकांना कठीण वाटतं. (How to make medu vada less oily) घरी वडे बनवण्यासाठी त्याची परफेक्ट पद्धत माहित असावी लागते. खाली दिलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्यातर हॉटेलस्टाईल कुरकुरीत मेदूवडे घरीच तयार होईल. (How to make crispy soft medu vada)
साहित्य
१ कप भिजवलेली उडीदाची डाळ
१ कप भिजवलेले पोहे
१ चमचा बारीक चिरलेलं आलं
१ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
३ ते ४ चमचे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१ ते २ तांदळाचं पीठ
अर्धा चमचा काळी मिरी
चुटकीभर हिंग
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
कृती
१) मार्केटसारखे मेदूवडे बनवण्यासाठी ५ ते ६ तासांसाठी उडीदाची डाळ पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे डाळ व्यवस्थित फुलते आणि एक स्मूद पेस्ट तयार होते. भिजवलेली दाळ पाण्यातून काढून घ्या नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर त्यात मीठ, हिंग, काळी मिरी घालून व्यवस्थितत दळून घ्या. डाळ दळत असताना जास्त पाण्याचा वापर करून करू नका. कारण मेदू वड्यांसाठी जाडसर पेस्ट लागते.
डोसा तव्याला चिकटतो? तव्यावर डोसा टाकण्याच्या सोप्या टिप्स, बनेल हॉटेलसारखा परफेक्ट डोसा
२) नंतर वाटीभर भिजवलेले पोहे मिक्सरमधून बारीक करून घ्या याची पेस्ट डाळीच्या मिश्रणात घाला. नंतर त्यात हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर घालून मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. वड्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी १ ते २ चमचे तांदळाचं पीठ घालून एकजीव करा.
३) आता कढईत तेल गरम करायला ठेवा. तुम्ही रिफाईंड ऑईल, नारळाचं तेल वापरू शकता. जर तुम्ही पहिल्यांदाच वडे बनवत असाल तर कढईमध्ये वडे घालण्यासाठी प्लास्टीकचे हॅण्ड ग्लोव्हज घाला. त्यानंतर हाताला तेल लावून व्यवस्थित शेप द्या.
न वाफवता करा महिनाभर टिकणारी खास अळूवडी; कुरकुरीत वडीची एकदम सोपी, खमंग रेसिपी
४) यानंतर कढईत मेदूवडे सोडा. जर तुम्हाला मेदूवड्यांना व्यवस्थित आकार देता येत नसेल तर तुम्ही चहाच्या गाळणीचा वापर करू शकता. चहाची गाळणी ओली करून उलट्या बाजूला पीठ ठेवून गोलाकार फिरवा मग छिद्र पाडून तेलात सोडून तळून घ्या.
५) आधी उच्च आचेवर तळल्यानंतर गॅस मंद ठेवा. जर तुम्ही फक्त उच्च आचेवर वडे तळत राहिलात तर वडे वरून फ्राय होतील आणि आतून कच्चे राहतील. वड्यांना गोल्डन-ब्राऊन रंग आल्यानंतर एका टिश्यूपेपरवर काढून घ्या. गरमागरम मेदू वडा तुम्ही सांभर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता.