Lokmat Sakhi >Food > साऊथ इंडियन पारंपरिक पद्धतीची बटाट्याची भाजी करा फक्त १५ मिनिटांत, चमचमीत इतकी की खातच राहावी!

साऊथ इंडियन पारंपरिक पद्धतीची बटाट्याची भाजी करा फक्त १५ मिनिटांत, चमचमीत इतकी की खातच राहावी!

South Indian Potato Recipe (15 Minutes Recipe) : २ बटाटे काही घरगुती मसाले; एकदा दाक्षिणात्य पद्धतीची चविष्ट बटाट्याची भाजी करून पाहाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 06:44 PM2024-06-13T18:44:33+5:302024-06-13T18:45:30+5:30

South Indian Potato Recipe (15 Minutes Recipe) : २ बटाटे काही घरगुती मसाले; एकदा दाक्षिणात्य पद्धतीची चविष्ट बटाट्याची भाजी करून पाहाच..

South Indian Potato Recipe (15 Minutes Recipe) | साऊथ इंडियन पारंपरिक पद्धतीची बटाट्याची भाजी करा फक्त १५ मिनिटांत, चमचमीत इतकी की खातच राहावी!

साऊथ इंडियन पारंपरिक पद्धतीची बटाट्याची भाजी करा फक्त १५ मिनिटांत, चमचमीत इतकी की खातच राहावी!

भारत हा खवय्यांचा देश आहे. प्रत्येक राज्यात आपल्याला खाद्यसंस्कृती पाहायला मिळेल (Batatyachi Bhaji). बऱ्याच जणांना साऊथ इंडिअन पदार्थ फार आवडतात. इडली, डोसा, मेदूवडे नंतर तेथील भाज्यांचे प्रकारही आवडीने खाल्ले जातात (Food). साउथ इंडिअन पदार्थांमध्ये इडली, डोसा, मेदूवडे, अप्पे फेमस आहेत. पण आपण कधी दाक्षिणात्य पद्धतीने बटाट्याची भाजी खाऊन पाहिली आहे का?

दाक्षिणात्य पद्धतीची बटाट्याची भाजी चवीला भन्नाट आणि रुचकर लागते (Cooking Tips). शिवाय कमी वेळात कमी साहित्यात तयार होते. बटाट्याची भाजी आपण खाल्लीच असेल, आता दाक्षिणात्य पद्धतीची बटाट्याची भाजी करून पाहा. झटपट रेसिपी बनेल १५ मिनिटात(South Indian Potato Recipe (15 Minutes Recipe)).

दाक्षिणात्य पद्धतीची बटाट्याची भाजी कशी करायची?

लागणारं साहित्य

बटाटे

हळद

जान्हवी कपूरला आवडतो तसा करा मुगाचा डोसा, वाटीभर हिरव्या मुगाचा झटपट पदार्थ-वजन वाढवत नाही

मीठ

पाणी

तेल

कांदे

लसूण

हिरवी मिरची

टोमॅटो

लाल तिखट

कृती

सर्वात आधी बटाट्याची साल सोलून घ्या. त्याचे चौकोनी तुकडे करा. प्रेशर कुकरमध्ये बटाट्याचे तुकडे, हळद, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून प्रेशर कुकरचं झाकण लावा. २ शिट्टीनंतर गॅस बंद करा. कढईमध्ये २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, मोहरी, चिमुटभर हिंग, मेथी दाणे, चणा डाळ, कडीपत्ता घालून साहित्य भाजून घ्या.

तेलात साहित्य भाजून घेतल्यानंतर चिंच, २ लाल सुक्या मिरच्या घालून परतवून घ्या. परतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व त्याची पावडर तयार करा. तयार पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात २ कांदे, लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, टोमॅटो घालून पेस्ट तयार करा.

मिक्सरच्या भांड्यात १० मिनिटात करा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा; टिफिनसाठी बेस्ट - सोपी रेसिपी

आता कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा लाल तिखट, एक चमचा धणे पूड आणि चिमुटभर हळद घाला. नंतर कांदा -  टोमॅटोची पेस्ट घालून मिक्स करा. मग मसाल्यांची पावडर घालून सर्व साहित्य एकजीव करा.

मसाले भाजून घेतल्यानंतर त्यात उकडलेले बटाटे घालून मिक्स करा. एक कप पाणी घाला. ५ मिनिटांसाठी भाजी शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे दाक्षिणात्य पद्धतीची बटाट्याची भाजी खाण्यासाठी रेडी.

Web Title: South Indian Potato Recipe (15 Minutes Recipe)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.