दाक्षिणात्य पदार्थांमध्ये (South Food) इडली हा फेमस आणि पौष्टीक पदार्थ आहे (Idli Recipe). इडली खाण्याचे अनेक फायदे आहेत (Idli). वाफवलेली इडलीसोबत सांबार आणि चटणी अप्रतिम लागते (South Indian Food). इडलीसोबत सांबार आणि चटणी खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते (Cooking tips). इडली हा खरंतर आंबवून तयार करण्यात येणारा पदार्थ आहे. उडीदाची डाळ हा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत आहे. याशिवाय तांदळातून कार्बोहायड्रेट्सही मिळतात. या दोन्हींच्या कॉम्बिनेशनमुळे शरीराला आवश्यक असलेले घटक मिळतात.
पण घरी इडली तयार केल्यास मऊ लुसलुशीत होत नाही. कधी कधी इडली कडक होते. किंवा इडलीचं बॅटर व्यवस्थित फरमेण्ट न झाल्यामुळे इडली चवीला बिघडते. इडली घरी करताना दाक्षिणात्य पद्धतीने तयार होत नाही. जर आपल्याला परफेक्ट साऊथ स्टाईल मऊ लुसलुशीत इडली करायची असेल तर, काही टिप्स लक्षात ठेवा. इडली परफेक्ट होईल(South Indian Rice Idli Recipe | Steamed Rice Cakes).
इडली मऊ लुसलुशीत होण्यासाठी काही खास टिप्स
- दाक्षिणात्य पद्धतीची इडली करताना बऱ्याचदा प्रमाणही चुकतं. ३ कप तांदूळ घेत असाल तर, १ वाटी उडदाची डाळ घ्या. या प्रमाणात डाळ- तांदूळ भिजत घातल्याने इडल्या मऊ - लुसलुशीत परफेक्ट तयार होतील.
- तांदूळ भिजत घातल्याने इडल्या मऊ - लुसलुशीत परफेक्ट तयार होतील.
ऐन तारुण्यात पायऱ्या चढताना दम लागतो - श्वास फुलतो? ५ गोष्टी; दम लागणं बंद - ताकद वाढेल
- इडलीसाठी डाळ - तांदूळ निदान ४-५ तासांसाठी भिजत ठेवा. ५ तासानंतर डाळ - तांदूळ बारीक वाटून घ्या. डाळ - तांदूळ वाटताना त्यात कमी प्रमाणात पाणी घाला. जास्त घालू नये, यामुळे इडलीचं बॅटर पातळ होऊ शकतं.
- डाळ - तांदुळाची पेस्ट तयार झाल्यानंतर बॅटर व्यवस्थित फरमेण्ट करण्यासाठी ठेवा. यासाठी त्यावर झाकण ठेवा. ८ तासांसाठी बॅटर फरमेण्ट होण्यासाठी ठेवा. जेणेकरून इडल्या छान फुलतील.
भाजलेले की भिजवलेले? चणे नेमके कसे - केव्हा खाणे योग्य? वजन कमी करायचा फायदा हवा तर..
- इडलीचं बॅटर फरमेण्ट झाल्यानंतर त्यात योग्य प्रमाणात पाणी घाला. जर आपण त्याच बॅटरचे डोसे किंवा आप्पे करत असाल तर, त्यात जास्त पाणी घालणं टाळा.
- स्टीमरमध्ये इडली तयार करताना गॅसची फ्लेम मिडीयम ठेवा. जास्त किंवा कमी ठेवल्यास इडली व्यवस्थित तयार होणार नाही. शिवाय कडकही होतील.
- इडलीचं बॅटर जर व्यवस्थित फुलत नसेल, तर त्यात आपण बेकिंग सोडा घालू शकता. यामुळे इडल्या छान फुलतील.