Lokmat Sakhi >Food > बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट मेदूवडे घरीच करा; कमी तेल पिणाऱ्या, क्रिस्पी वड्यांची रेसेपी

बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट मेदूवडे घरीच करा; कमी तेल पिणाऱ्या, क्रिस्पी वड्यांची रेसेपी

South Indian Style Medu vada Recipe : मेदू वडे घरी बनवलेले जास्त पौष्टीक असतात. कारण यात तुम्ही कोणतं तेल वापरता याची तुम्हाला माहिती असते आणि स्वच्छतेचीही  काळजी घेतली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 09:38 AM2023-04-26T09:38:00+5:302023-04-26T09:40:02+5:30

South Indian Style Medu vada Recipe : मेदू वडे घरी बनवलेले जास्त पौष्टीक असतात. कारण यात तुम्ही कोणतं तेल वापरता याची तुम्हाला माहिती असते आणि स्वच्छतेचीही  काळजी घेतली जाते.

South Indian Style Medu vada Recipe :How to make crispy medu vada at home | बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट मेदूवडे घरीच करा; कमी तेल पिणाऱ्या, क्रिस्पी वड्यांची रेसेपी

बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट मेदूवडे घरीच करा; कमी तेल पिणाऱ्या, क्रिस्पी वड्यांची रेसेपी

नाश्त्याला काहीतरी नवीन क्रिस्पी खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही हॉटेलस्टाईल मेदूवडे घरीच बनवू शकता. मेदूवडे बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही फक्त सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.(Medu Vada Recipe) मेदू वडे घरी बनवलेले जास्त पौष्टीक असतात. कारण यात तुम्ही कोणतं तेल वापरता याची तुम्हाला माहिती असते आणि स्वच्छतेचीही  काळजी घेतली जाते.(South Indian Style Meduvada Recipe) याशिवाय घरातील सर्वजण पोटभर हे पदार्थ खातात. रात्री उडदाची डाळ भिजवून ठेवली तर सकाळी तुम्ही कुरकुरीत वडे कधीही बनवू शकता. (How to make meduvada) 

सगळ्यात आधी उडीदाची डाळ पाण्यात भिजवून घ्या.  एका मिक्सरच्या भांड्यात खोबरं, मिरच्या, आलं घालून बारीक करून घ्या. नंतर भिजवलेली डाळ व्यवस्थित दळून घ्या. ही पेस्ट जास्त घट्ट किंवा पातळ नसावी. हाताला चिकटेल असं मिश्रण असावं.  डाळ दळून झाल्यानंतर त्यात मीठ आणि मिक्सरमधून वाटून घेतलेलं साहित्य घाला. कोथिंबीर घालून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या.

हाताला पाणी लावून या मिश्रणाचे गोलाकार वडे बनवा आणि त्याला मेदू वड्यांप्रमाणे आकार द्या. तुम्ही या वड्यांना चहाच्या गाळणीच्या साहाय्यानंही आकार देऊ शकता. गरमागरम तेलात हे वडे तळायला सोडा. तयार आहेत गरमागरम कुरकुरीत मेंदूवडे. खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसह तुम्ही हे वडे खाऊ शकता. दुपारच्या जेवणासाठीही हे वडे उत्तम ऑप्शन आहेत. 

उडीदाच्या डाळीचे फायदे

उडदाची डाळ पचनक्रिया मजबूत करते. यामध्ये आढळणारे फायबर तुमची चयापचय क्रिया मजबूत करण्यास मोठ्या प्रमाणात मदत करते. जुलाब, बद्धकोष्ठता, पोटात गोळा येणे या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी तुमच्या आहारात उडीद डाळीचा अवश्य समावेश करा.

रेस्टोरंटस्टाइल मऊ -मोकळा जीरा राईस कुकरमध्ये करा; सोपी ट्रिक, जीरा राईस होईल परफेक्ट

रोजच्या आहारात याचा समावेश केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामध्ये असलेले मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स त्वचेच्या काळजीसाठी खूप चांगले आहेत. हे खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक आणि घट्टपणा राहतो आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे, सुरकुत्याही कमी होऊ लागतात.

विरजणाशिवाय घट्ट, मलईदार दही लावण्याच्या ४ ट्रिक्स; विकतसारखं परफेक्ट दही बनेल घरीच

या डाळीच्या सेवनामुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. या डाळीमध्ये फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे मिश्रण असते जे हृदयरोग्यांसाठी खूप चांगले मानले जाते. त्यामुळे हृदयरोग्यांनी या डाळीचे सेवन जरूर करावे.त्यामुळे हाडे मजबूत होतात. त्यात आढळणारे कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक हाडांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात.

Web Title: South Indian Style Medu vada Recipe :How to make crispy medu vada at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.