Join us  

हॉटेलस्टाइल व्हेज सोया ६५ घरी करण्याची परफेक्ट रेसिपी, स्टार्टर म्हणून मस्त चटकदार पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2023 11:31 AM

Soya 65 Recipe/ Quick Veg Starter Recipe सायंकाळी चहासोबत किंवा स्टार्टर म्हणून हा पदार्थ एकदम उत्तम आणि करायलाही सोपा

प्रोटीनयुक्त सोया चंक्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामध्ये प्रोटीन व्यतिरिक्त फायबर आणि अनेक पोषक गुणधर्म असतात. सोयाबीनचे अनेक पदार्थ केले जातात. सोया चंक्सचे कबाब, ग्रेवी भाजी, सोयाबीन मसाला, सोयाबीन कटलेट्स, असे अनेक पदार्थ केले जातात. आहारामध्ये सोयाबीनचा नियमित वापर केल्याने हाडांना बळकटी मिळते, कोलेस्ट्रॉल कमी होते, पोटाच्या अनेक समस्या दूर होतात.

सोयाबीनचे तेच - तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, आपण मसालेदार सोया ६५ ही रेसिपी ट्राय करू शकता. आपण ही रेसिपी घरी देखील बनवू शकता. चला तर मग या पौष्टीक चमचमीत मसालेदार सोया ६५ या रेसिपीची कृती पाहूयात(Soya 65 Recipe/ Quick Veg Starter Recipe).

मसालेदार सोया ६५ करण्यासाठी लागणारं साहित्य

सोया चंक्स

पाणी

दही

आलं - लसूण पेस्ट

जिरं पावडर

धणे पूड

गरम मसाला

गावरान पद्धतीने घरीच करा झणझणीत बटाट्याचे भरीत, चव अशी की म्हणाल क्या बात..

लाल तिखट

आमचूर पावडर

मीठ

तांदळाचं पीठ

तेल

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा, पाणी गरम झाल्यानंतर त्यात एक कप सोया चंक्स घालून गॅस बंद करा. १० मिनिटानंतर त्यातून सोया चंक्स बाहेर काढा. व सामान्य पाण्यातून २ ते ३ वेळा धुवून घ्या, हाताने दाबून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. व हे सोया चंक्स एका बाऊलमध्ये काढून घ्या.

दुसऱ्या बाऊलमध्ये एक कप दही, एक टेबलस्पून आलं - लसूण पेस्ट, एक टेबलस्पून जिरं पावडर, एक टेबलस्पून धणे पूड, एक टेबलस्पून गरम मसाला, एक टेबलस्पून लाल तिखट, एक टेबलस्पून आमचूर पावडर व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करा. आता त्यात सोया चंक्स घालून संपूर्ण मिश्रण मिक्स करा.

ना पाक करण्याची झंझट, ना लाडू फसण्याची भीती, झटपट करा रव्याचे लाडू!

१० ते २० मिनिटांसाठी सोया चंक्स मॅरिनेटसाठी ठेवा. २० मिनिटानंतर त्यात २ टेबलस्पून तांदळाचं पीठ घालून मिश्रण एकजीव करा. आता एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक - एक करून सोया चंक्स तळण्यासाठी सोडा, सोनेरी रंग येऊपर्यंत सोया चंक्स तळून घ्या. अशा प्रकारे मसालेदार सोया ६५ खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.