Join us  

१ कप सोया चंक्सचे करा इन्स्टंट आप्पे, १० मिनिटांत खा चमचमीत सोयाबिन आप्पे, वजनही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 3:16 PM

Soyabean Appe: Healthy Breakfast and Teatime Snack : भूक लागली आहे? मग हाय-प्रोटीन सोया चंक्सचे इन्स्टंट हेल्दी आप्पे खाऊन पाहा..

नाश्त्याला पोहे, उपमा आपण खातोच (High Protien Appe). काहीतरी वेगळं म्हणून आपण साऊथ इंडियन किंवा गुजराथी पदार्थही ट्राय करतो. इडली, डोसा, आप्पे हे पदार्थ डाळ तांदुळाच्या बॅटरपासून तयार होतात. पण कधी -कधी  डाळ-तांदूळ भिजत घालायला वेळ मिळत नाही. बऱ्याचदा आपल्याला आप्पे खाण्याची प्रचंड इच्छा होते (Cooking Tips). अशावेळी आपण आप्पे विकतचे आणून खातो.

जर आपल्या आप्पे खाण्याची तीव्र इच्छा झाली असले तर, कपभर सोया चंक्सचे आप्पे ट्राय करून पाहा. सोया चंक्समध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय वेट लॉससाठीही मदत होते. सोया चंक्सचे इन्स्टंट आप्पे तयार कसे करायचे? पाहूयात(Soyabean Appe: Healthy Breakfast and Teatime Snack).

सोया चंक्सचे इन्स्टंट आप्पे करण्यासाठी लागणारं साहित्य

सोया चंक्स

दही

पाणी

रवा

मीठ

इनो

कांदा

व्हा इडलीसारखे हलके! नाश्त्याला खा ५ आंबवलेले पदा‌र्थ! वजन कधी घटलं कळणारही नाही..

टोमॅटो

कोथिंबीर

हिरवी मिरची

तेल

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप सोया चंक्स घ्या. त्यात पाणी घालून धुवून घ्या. पुन्हा त्यात एक कप पाणी घाला. ५ मिनिटानंतर हाताने सोया चंक्समधील अतिरिक्त पाणी दाबून काढा.

मिक्सरच्या भांड्यात भिजलेले सोया चंक्स घाला. नंतर त्यात एक कप रवा, एक कप दही आणि अर्धा कप पाणी घालून मिश्रण वाटून घ्या. गुळगुळीत तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा इनो घालून मिक्स करा. दुसरीकडे आप्पे पात्र गरम करण्यासाठी ठेवा.

त्यावर थोडे ब्रशने तेल लावा. बॅटरमध्ये आपण आपल्या आवडीच्या भाज्या मिक्स करू शकता. आप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्यात चमचाभर बॅटर ओतून घ्या. त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा, व दोन्ही बाजूने आप्पे भाजून घ्या. अशाप्रकारे सोया चंक्सचे इन्स्टंट आप्पे खाण्यासाठी रेडी. आपण हे इन्स्टंट आप्पे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता.

१० दिवसात तुळस दिसेल डेरेदार - हिरवीगार! फक्त कुंडीत चमचाभर 'ही' पांढरी गोष्ट नक्की घाला

सोया चंक्स खाण्याचे फायदे

सोयाबिनमध्ये अनेक पौष्टीक घटक असतात. त्यात अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. शिवाय त्यात फायबर, प्रथिने आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स देखील आढळतात. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते. शिवाय चयापचय क्रिया बुस्ट होते.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.