Lokmat Sakhi >Food > भोगीचा अस्सल मराठवाडी खास बेत, तीळ लावून बाजरीची भाकरी, भोगीची भाजी आणि खिचडी!

भोगीचा अस्सल मराठवाडी खास बेत, तीळ लावून बाजरीची भाकरी, भोगीची भाजी आणि खिचडी!

Food and recipe: बघा भाेगीच्या दिवशी कसा रंगतो मराठवाड्यात खास बेत.. काय बरं खासियत या जेवणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 05:07 PM2022-01-11T17:07:50+5:302022-01-11T17:09:20+5:30

Food and recipe: बघा भाेगीच्या दिवशी कसा रंगतो मराठवाड्यात खास बेत.. काय बरं खासियत या जेवणाची?

Special authentic lunch in Marathwada for Makar Sankranti special Bhogi festival | भोगीचा अस्सल मराठवाडी खास बेत, तीळ लावून बाजरीची भाकरी, भोगीची भाजी आणि खिचडी!

भोगीचा अस्सल मराठवाडी खास बेत, तीळ लावून बाजरीची भाकरी, भोगीची भाजी आणि खिचडी!

Highlightsमराठवाड्याच्या भोगीच्या मिक्स भाजीला लेकुरवाळी भाजी म्हणतात.या दिवसात हिवाळी रानमेवा म्हणाव्यात अशा ज्या काही ताज्या ताज्या भाज्या शेतात येतात, त्या सगळ्या भाज्या या भाजीत टाकल्या जातात.

तीळ- गुळाची पोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार असा झकास बेत संक्रांतीच्या दिवशी असतोच. पण खवय्यांसाठी संक्रांतीइतकेच (sankranti special food) किंबहुना त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे असते ते भोगीचे जेवण. संक्रांतीच्या आदल्यादिवशी भोगीचा सण साजरा केला जतो. महिलांच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा असला तरी या दिवसाच्या जेवणाची प्रतिक्षा मात्र घरातल्या सगळ्यांनाच असते. 

 

संक्रांत हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. सणाची नावं वेगवेगळी असली तरी सण साजरा करण्याचा उत्साह मात्र तोच असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर काही प्रांतात भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशीचे जेवण महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळे असते. मराठवाडा, कोकण, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणची हिवाळ्यातली खाद्य संस्कृती यानिमित्ताने दिसून येते. 

 

भोगीच्या दिवशी मराठवाड्यात बाजरीच्या भाकरी आणि मिक्स भाजी या दोन गोष्टींना विशेष महत्त्व आहे. आपण नेहमी करतो, तशा या भाकरी नसतात. भोगीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या भाकऱ्यांवर छानपैकी तीळाची पेरणी केली जाते. अशी ही तीळ लावून केलेली भाकरी जेव्हा थेट गॅसवर टाकून भाजण्यात येते तेव्हा तीळ अगदी खरपूस भाजले जातात आणि भाकरीची चव आणखीनच खमंग लागते. अशा या भाकरीवर लोण्याचा गोळा किंवा साजूक तूप टाकले जाते आणि भोगीच्या भाजीसोबत ती खाल्ली जाते. तीळ लावून भाकरी कशी करायची, याचा एक खास व्हिडिओ आहारतज्ज्ञ कांचन बापट (Dietition Kanchan Bapat) यांनी त्यांच्या Kanchan Bapat Recipes या युट्यूब पेजवर शेअर केला आहे. भाकरी उत्कृष्ट होण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या याविषयीही बापट यांनी सविस्तर बारकावे सांगितले आहेत.

 

भोगीची लेकुरवाळी भाजी
मराठवाड्याच्या भोगीच्या मिक्स भाजीला लेकुरवाळी भाजी म्हणतात. या दिवसात हिवाळी रानमेवा म्हणाव्यात अशा ज्या काही ताज्या ताज्या भाज्या शेतात येतात, त्या सगळ्या भाज्या या भाजीत टाकल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने गाजर, वटाणे, वालाच्या शेंगा, पेरू, वांगी, हरबरे, कांद्याची पात या भाज्यांचा वापर केला जातो. ही भाजी बनविण्यासाठी तेल तापवून मोहरीची फोडणी केली जाते आणि त्यात थोडे तीळही घातले जातात. त्यानंतर वरील भाज्यांचे बारीक तुकडे कढईत टाकून परतायचे. वाफ आली की थोडे पाणी टाकायचे. त्यानंतर दाण्याचा आणि तिळाचा कुट त्यात टाकून चवीनुसार तिखट, मीठ टाकले की झाली भोगीची लेकुरवाळी भाजी तयार. 

 

याच्या जोडीला करा मुगाच्या डाळीची खिचडी (mung daal khichadi)
भाजी आणि बाजरीची भाकरी हा दणदणीत बेत असल्याने भोगीच्या दिवशी त्याच्या जोडीला साधी खिचडी बनविली जाते. मिक्स भाजी असल्याने सहसा खिचडीत कोणतीही भाजी टाकली जात नाही. फक्त हळद, हिंग, मीठ टाकून केलेली पिवळी खिचडी यादिवशी अनेक घरांमध्ये दिसून येते. 

 

Web Title: Special authentic lunch in Marathwada for Makar Sankranti special Bhogi festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.