Lokmat Sakhi >Food > भोगीची लेकुरवाळी भाजी करा पारंपरिक पद्धतीने, लक्षात ठेवा ३ गोष्टी! जो खाई भोगी तो..

भोगीची लेकुरवाळी भाजी करा पारंपरिक पद्धतीने, लक्षात ठेवा ३ गोष्टी! जो खाई भोगी तो..

Special Authentic Vegetable lekurwali Bhaji for Bhogi Makar Sankranti : आधीपासूनच थोडी तयारी करुन ठेवलेली असेल तर ही भाजी करण्याचा ताण येत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2024 02:23 PM2024-01-10T14:23:07+5:302024-01-10T15:21:23+5:30

Special Authentic Vegetable lekurwali Bhaji for Bhogi Makar Sankranti : आधीपासूनच थोडी तयारी करुन ठेवलेली असेल तर ही भाजी करण्याचा ताण येत नाही.

Special Authentic Vegetable lekurwali Bhaji for Bhogi Makar Sankranti : Remember 3 things while making Bhogi Lekurwali Bhaji; The traditional way of vegetables will be instant-tasty… | भोगीची लेकुरवाळी भाजी करा पारंपरिक पद्धतीने, लक्षात ठेवा ३ गोष्टी! जो खाई भोगी तो..

भोगीची लेकुरवाळी भाजी करा पारंपरिक पद्धतीने, लक्षात ठेवा ३ गोष्टी! जो खाई भोगी तो..

संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण म्हणजे भोगी. आपल्याकडे प्रत्येक सणाला धार्मिक महत्त्व सांगितले असले तरी त्यामागे शास्त्रीय कारणे असतात. विशिष्ट ऋतुनूसार आपल्याकडे आहारात बदल होतो. थंडीच्या दिवसांत एरवी बाजारात अजिबात न दिसणाऱ्या अशा भरपूर भाज्या येतात.या भाज्या शरीराला पोषण देणाऱ्या असल्याने त्या या काळात आवर्जून खायला हव्यात. मात्र आपण त्या खातोच असे नाही.म्हणूनच भोगीच्या निमित्ताने बाजारात मिळणाऱ्या या भाज्यांची लेकुरवाळी भाजी आवर्जून केली जाते. भाज्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात (Special Authentic Vegetable lekurwali Bhaji for Bhogi Makar Sankranti).

पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही भोगीची भाजी करायली बराच वेळ लागत असल्याने बरेच जण ही भाजी करणे टाळतात. पण असे न करता आधीपासूनच थोडी तयारी करुन ठेवलेली असेल तर ही भाजी करण्याचा ताण येत नाही. शरीरातील ऊर्जा टिकून राहावी यासाठी या भाजीत तिळाचा कूटही वापरला जातो. त्यासोबत बाजरीची तीळ लावलेली भाकरी, गूळ हा या काळात घ्यायला हवा असा पोषक आहार भोगीच्या निमित्ताने करण्याची परंपरा आहे. .

(Image : Google)
(Image : Google)

१. कोणतीही भाजी चविष्ट करायची असेल तर त्या भाजीचा मसाला चविष्ट असायला लागतो. भोगीच्या भाजीला तिळाच्या कुटाचे महत्त्व असते, पण तीळ घालायचे असतील तरी नुसत्या तिळाने भाजीला दाटसरपणा येत नाही.म्हणूनच या भाजीसाठी आधीच छान वाटण तयार करुन ठेवले तर ऐनवेळी धावपळ होत नाही. आता हे वाटण नेमकं कसं करायचं. तर यासाठी ओलं किंवा सुकं खोबरं, थोडे दाणे, तीळ चांगले भाजून घ्यावेत. त्यामध्ये थोडं जीरं आणि भरपूर कोथिंबीर घालून हे मिश्रण मिक्सरमधून वाटून ठेवावे.हा मसाला तयार असेल तर ऐनवेळी भाजी करायला जास्त वेळ लागत नाही. 

२. ही भाजी करायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यामध्ये बऱ्याच भाज्या असतात. या सगळ्या भाज्या निवडून, सोलून मग चिराव्या लागतात. ही सगळी वेळखाऊ प्रक्रिया असल्याने ती तयारी आधीपासून करुन ठेवायला हवी. वालाच्या शेंगा, मटार, हरभरा, पावटा, घेवडा यांसारख्या भाज्या आधीच सोलून ठेवलेल्या असतील तर ऐनवेळी भाजी करण्याचे काम सोपे होऊ शकते. भाजी थोडी आधीच आणून ठेवलेली असेल तर घरातील सगळे मिळून गप्पा मारता मारता हे काम झटपट करु शकतात. 

(Image : Google)
(Image : Google)

३. भोगीच्या भाजीमध्ये आपण बऱ्याच वेगवेगळ्या भाज्या वापरतो. यातील काही भाज्या जास्त तर कमी भाज्या कमी असण्याची शक्यता असते. पण असे झाले तर ती भाजी म्हणावी तितकी छान होत नाही. त्यामुळे यातील प्रत्येक भाजी योग्य त्या प्रमाणातच असायला हवी. सगळ्या भाज्या नीट योग्य प्रमाणात असतील तर त्या भाज्या छान मिळून येतात आणि भाजीला चवही अतिशय छान येते

Web Title: Special Authentic Vegetable lekurwali Bhaji for Bhogi Makar Sankranti : Remember 3 things while making Bhogi Lekurwali Bhaji; The traditional way of vegetables will be instant-tasty…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.