Lokmat Sakhi >Food > घर, ऑफिस आणि दिवसभराचा उपवास, स्टॅमिना होतो डाऊन? प्या स्पेशल ड्रिंक, वाढवा एनर्जी

घर, ऑफिस आणि दिवसभराचा उपवास, स्टॅमिना होतो डाऊन? प्या स्पेशल ड्रिंक, वाढवा एनर्जी

Food and recipe: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये उपवास करण्याचं प्रमाण तसंही जास्तच.. म्हणूनच तर घर, ऑफिस अशी सगळी ओढाताण सांभाळत उपवास करायचा असेल तर हे स्पेशल एनर्जी ड्रिंक (how to make badam milk) तुमच्याकडे हवंच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 06:02 PM2022-02-28T18:02:13+5:302022-02-28T18:07:31+5:30

Food and recipe: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये उपवास करण्याचं प्रमाण तसंही जास्तच.. म्हणूनच तर घर, ऑफिस अशी सगळी ओढाताण सांभाळत उपवास करायचा असेल तर हे स्पेशल एनर्जी ड्रिंक (how to make badam milk) तुमच्याकडे हवंच...

Special drink for mahashivratri fast, badam or almond milk is the rich source of energy helps to boost stamina | घर, ऑफिस आणि दिवसभराचा उपवास, स्टॅमिना होतो डाऊन? प्या स्पेशल ड्रिंक, वाढवा एनर्जी

घर, ऑफिस आणि दिवसभराचा उपवास, स्टॅमिना होतो डाऊन? प्या स्पेशल ड्रिंक, वाढवा एनर्जी

Highlightsउपवासाच्या दिवशी बदामाचं दूध प्यायला विसरू नका.यामुळे मग एकवेळ ठोस आहार घेतला नाही तरी चालतो. अंगात एनर्जी टिकून राहते आणि विशेष म्हणजे अजिबातच थकवा जाणवत नाही. 

महाशिवरात्रीच्या उपवासाची (energy drink for fast) तयारी अनेक घरांमध्ये सुरू झालेली असणार.. उपवासानिमित्त काय- काय मेन्यू करायचा, हे देखील एव्हाना ठरलेलं असेल.. अनेक घरांमध्ये महाशिवरात्र, आषाढी एकादशी असे उपवास  घरातले सगळे जण मिळून करतात. त्यामुळे या उपवासाच्या दिवशी खाण्यापिण्याची रेलचेल असते. पण एरवी मंगळवार, शुक्रवार असे आठवडी उपवास घरातली महिला एकेकटीच करणारी असते. अशावेळी ती तिच्या खाण्याकडे हमखास दुर्लक्ष करते.(how to make badam milk)

 

एकटीसाठी कुठे काय करत बसायचं.. काही तरी पटकन तोंडात टाकू झालं.. अशी अनेक मैत्रिणींची सवय असते. एकटीसाठी त्या उपवासाचं काहीही व्यवस्थित करत नाही. उपवास आणि त्यात पुन्हा घर, ऑफिस यांच्या नेहमीच्या ठरलेल्या जबाबदाऱ्या. ही सगळी रोजची काम करताना मग उपवासाच्या दिवशी हमखास थकवा येतो. एनर्जी, स्टॅमिना डाऊन होतो. अशक्तपणा जाणवू लागतो. म्हणूनच हे सगळं टाळायचं असेल तर उपवासाच्या दिवशी बदामाचं दूध हे स्पेशल ड्रिंक प्यायला विसरू नका. यामुळे मग एकवेळ ठोस आहार घेतला नाही तरी चालतो. अंगात एनर्जी टिकून राहते आणि विशेष म्हणजे अजिबातच थकवा जाणवत नाही. 

 

कसं करायचं बदाम दूध.. (how to make badam milk)
१. यासाठी २० बदाम रात्रभर एका कटोरीमध्ये पाणी टाकून त्यात भिजत ठेवा.
२. सकाळी हे बदाम मिक्सरच्या भांड्यात टाका. तुम्हाला हवं असेल तर साले काढून घ्या किंवा नाही काढली तरी चालेल.
३. मिक्सरच्या भांड्यातच एक चतुर्थांश टी स्पून व्हॅनिला इसेन्स, एक टेबलस्पून साखर आणि तीन ते चार कप थंड पाणी टाका.
४. हे मिश्रण मिक्सरमधून एकदम बारिक करून घ्या. या मिश्रणात बदामाचे तुकडे रहायला नकोत. जेवढं मिश्रण एकजीव होईल, तेवढं हे दूध चवदार लागेल.
५. हे दूध थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. तुमच्या गरजेनुसार या थंड आणि पौष्टिक दुधाचा आस्वाद घ्या.
६. फ्रिजमध्ये ठेवल्यास २ दिवसही हे दूध चांगले राहते.

 

बदाम दूध पिण्याचे फायदे (benefits of badam milk)
- या दूधातून आपल्याला जवळपास १३१ कॅलरी आणि ४. १ ग्रॅम एवढे प्रोटीन मिळते.
- त्यामुळे सकाळी नाश्ता झाल्यानंतर हे दूध घेतल्यास अंगात दिवसभर उर्जा टिकून राहते.
- या दूधात कोलेस्टरॉलचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. त्यामुळे हृदयासाठीही हे दूध घेणे चांगले आहे. 
- या दूधातून व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळते. 


 

Web Title: Special drink for mahashivratri fast, badam or almond milk is the rich source of energy helps to boost stamina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.