Lokmat Sakhi >Food > कडाक्याच्या थंडीत घ्यायलाच हवा गरमागरम इराणी चहा, बघा कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

कडाक्याच्या थंडीत घ्यायलाच हवा गरमागरम इराणी चहा, बघा कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

Irani Chai or Hydrabadi Dum Chai Recipe: चहाचे शौकिन असाल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी सांगितलेली ही रेसिपी पाहा आणि वाढत्या थंडीत एकदा इराणी चहा पिऊन बघाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 01:04 PM2022-12-26T13:04:15+5:302022-12-26T13:06:48+5:30

Irani Chai or Hydrabadi Dum Chai Recipe: चहाचे शौकिन असाल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी सांगितलेली ही रेसिपी पाहा आणि वाढत्या थंडीत एकदा इराणी चहा पिऊन बघाच...

Special Irani chai recipe for this winter.. How to make irani chai or Hydrabadi dum chai, Special recipe by Kunal Kapoor | कडाक्याच्या थंडीत घ्यायलाच हवा गरमागरम इराणी चहा, बघा कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

कडाक्याच्या थंडीत घ्यायलाच हवा गरमागरम इराणी चहा, बघा कुणाल कपूर यांची खास रेसिपी 

Highlightsइराणी चहालाच काही ठिकाणी 'हैद्राबादी चहा' किंवा 'हैद्राबाची दम चाय' असंही म्हणतात.चहा करण्यासाठी जे साहित्य लागतं त्यात फारसा फरक नसला तरी चहा करण्याची रेसिपी मात्र खूप वेगळी आहे. 

थंडी आणि पावसाळा हे दोन्ही ऋतू असे असतात की त्यामध्ये चहासोबतचं नातं अधिकच घट्ट होत जातं. पट्टीचे चहा प्रेमी नसलात तरी या दोन्ही ऋतूंमध्ये हमखास चहाची तल्लफ होतेच आणि मस्त वाफाळता, गरमागरम चहा समोर आला की मनाला कसं बरं वाटतं. म्हणूनच तर चहाप्रेमींना थंडीचा आनंद द्विगुणित करता यावा, यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी इराणी चहा (Special Irani chai recipe) कसा तयार करायचा, याची रेसिपी नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर कली आहे. (How to make irani chai or Hydrabadi dum chai)

इराणी चहा करण्याची रेसिपी
इराणी चहालाच काही ठिकाणी 'हैद्राबादी चहा' किंवा 'हैद्राबाची दम चाय' असंही म्हणतात. चहा करण्यासाठी जे साहित्य लागतं त्यात फारसा फरक नसला तरी चहा करण्याची रेसिपी मात्र खूप वेगळी आहे. 
साहित्य
२ कप पाणी
२ टीस्पून चहा पावडर

 

 

 

लायटरने गॅस शेगडी पेटत नाहीये? लगेच फेकून देऊ नका, त्याआधी करून बघा २ सोपे उपाय 
२ टीस्पून साखर आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता.
५०० मिली दूध
३ ते ४ वेलची
२ टेबलस्पून कंडेन्स मिल्क

 

कृती 
१. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा आणि त्यात चहा पावडर टाका. या भांड्यावर झाकण ठेवा. झाकणातून चहाची वाफ बाहेर येऊ नये म्हणून बिर्याणी करताना भांडे आणि झाकण यांच्याभोवती आपण जशी कणिक लावतो, तशी कणिक लावून घ्या. अशा पद्धतीने कमीतकमी २० ते २५ मिनिटे मंद आचेवर हे मिश्रण उकळू द्यावे.

 

२. यानंतर दुसऱ्या एका भांड्यात दूध उकळायला ठेवा. दुधामध्ये वेलची पावडर किंवा वेलची टाका.

३. दूध उकळून अर्धे झाले की त्यात कंडेन्स मिल्क टाका आणि पुन्हा एकदा एक उकळी येऊ द्या.

पाळीमध्ये खूपच पोट दुखतं? अंशुका परवानी सांगतात अशा वेळी झोपून राहण्याऐवजी ५ व्यायाम करा.. 

४. आता चहाच्या आधणाला चांगला दम देऊन झाला की त्यात साखर घाला आणि हे पाणी एका कपात गाळून घ्या. साधारण अर्धा कप भरेल एवढे टाकावे.

५. उरलेल्या अर्ध्याकपात उकळवलेले दूध घालावे. चहा हलवून घेतला की झाला तयार गरमागरम इराणी चहा.

Web Title: Special Irani chai recipe for this winter.. How to make irani chai or Hydrabadi dum chai, Special recipe by Kunal Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.