Join us  

कांदा-लसूण न घालता करा ढाबास्टाइल गरमागरम काला चना मसाला, फक्त १५ मिनिटांत चमचमीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2023 5:12 PM

Special kala chana masala | without onion or garlic - Kala chana Recipe चना मसाला करताना कांदा लसूण नसेल तर चवच येणार नाही असं अनेकांना वाटतं, ते खरं नाही.

काळ्या चण्याचे अनेक प्रकार केले जातात . रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर जेवायला गेल्यानंतर आपण काळ्या चण्याची भाजी खाल्लीच असेल. रेस्टॉरंट जाऊद्या, घरातील गृहिणीने देखील अनेकदा घरात काळ्या चण्याची भाजी किंवा उसळ केलीच असेल. काळे चणे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात जर कांदा, लसूण आणि टॉमेटोचा वापर केला, तर या भाजीला एक वेगळीच चव मिळते.

पण सध्या टॉमेटो महाग झालेत, म्हणून फार कमी लोकं भाजीत टॉमेटोचा वापर करतात. जर आपल्याला कांदा, लसूण आणि टॉमेटोचा वापर न करता काळा चणा मासला तयार करायचा असेल, तर स्टेप बाय स्टेप या रेसिपीला फॉलो करा. कमी वेळात हॉटेलस्टाईल भाजी तयार होईल(Special kala chana masala | without onion or garlic | Kala chana Recipe).

काळा चणा मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य

काळे चणे

पाणी

तमालपत्र

मीठ

तूप

आलं

चहाच्या टपरीवर मिळतो तसा 'उकाळा' करण्याची फक्कड रेसिपी, प्या आणि व्हा फ्रेश

हिरवी मिरची

लाल तिखट

जिरं पावडर

हळद

धणे पूड

काळी मिरी पावडर

काळे मीठ

आमचूर पावडर

कसुरी मेथी

कोथिंबीर

जिरं

हिंग

गरम मसाला

कृती

सर्वप्रथम, पाण्यात एक कप काळे चणे घालून ८ तासांसाठी भिजत ठेवा. गॅसवर प्रेशर कुकरचं भांडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात भिजवलेले चणे, २ कप पाणी, एक तमालपत्र, चवीनुसार मीठ, व एक चमचा तूप घाला. त्यावर कुकरचं झाकण झाका, व मिडीयम फ्लेमवर गॅस ठेवा. कुकरला २ शिट्टी आल्यानंतर गॅस बंद करा.

दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात दोन आल्याचे तुकडे, ४ हिरव्या मिरच्या, २ टेबलस्पून लाल तिखट, एक चमचा जिरं पावडर, अर्धा टेबलस्पून हळद, ३ चमचे धणे पूड, अर्धा टेबलस्पून काळी मिरी पावडर, अर्धा टेबलस्पून काळे मीठ, २ टेबलस्पून आमचूर पावडर, एक टेबलस्पून कसुरी मेथी, एक टेबलस्पून शिजवलेले काळे चणे, कोथिंबीर आणि शिजवलेल्या काळ्या चण्याचे पाणी घालून पेस्ट तयार करा.

कांद्याची झणझणीत चटणी करा, भाजी नसली तरी जेवण होईल पोटभर आणि चविष्ट

आता कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ टेबलस्पून तूप, एक टेबलस्पून जिरं, अर्धा चमचा हिंग, तयार मसाल्यांची पेस्ट घालून मिश्रणाला तेल सुटूपर्यंत भाजून घ्या. त्यात ३ टेबलस्पून शिजवलेल्या काळ्या चण्याचे पाणी घालून मिश्रणाला एक उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर त्यात शिजवलेले काळे चणे, चवीनुसार मीठ व अर्धा चमचा गरम मसाला घालून चमच्याने चांगले मिक्स करा. भाजी शिजवून घ्या. भाजी शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स