Lokmat Sakhi >Food > परफेक्ट पंजाबी लस्सी करण्याची खास पंजाबी रेसिपी, लस्सी प्या-खुश व्हा

परफेक्ट पंजाबी लस्सी करण्याची खास पंजाबी रेसिपी, लस्सी प्या-खुश व्हा

लस्सी पिण्यासाठी बाहेर कशाला जाता? घरच्याघरी पंजाब दी लस्सी करा आणि घशाला पडलेली कोरड घालवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 04:21 PM2022-04-06T16:21:22+5:302022-04-06T16:28:21+5:30

लस्सी पिण्यासाठी बाहेर कशाला जाता? घरच्याघरी पंजाब दी लस्सी करा आणि घशाला पडलेली कोरड घालवा.

Special Punjabi Recipe for Perfect Punjabi Lassi, Drink home made Lassi and be happy | परफेक्ट पंजाबी लस्सी करण्याची खास पंजाबी रेसिपी, लस्सी प्या-खुश व्हा

परफेक्ट पंजाबी लस्सी करण्याची खास पंजाबी रेसिपी, लस्सी प्या-खुश व्हा

Highlightsघरी केलेली लस्सी गोड ताकासारखी होते का?पंजाब स्टाइल घट्ट, मलईदार लस्सी घरच्याघरी करणं अजिबात अवघड नाही. 

उन्हाळ्यात सतत काहीतरी थंडंगार खावंसं प्यावंसं वाटतं. बाहेर पडलं की लस्सी पिण्याची हुक्की हमखास येते. उन्हाळ्यात लस्सी पिणं आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीरही असते.  पण घरच्या लस्सीला बाहेरच्या लस्सीसारखा दाटपणा येत नाही. त्यामुळे गोड ताक प्यायल्यासारखं वाटतं. पण घरच्याघरी पंजाबच्या स्टाइलची लस्सी केल्यास बाहेरची लस्सी प्यावीशी वाटणार नाही हे ही खरं. ही पंजाब स्टाइल लस्सी तयार करणं एकदम सोपं.

Image: Google

घरच्याघरी मलईदार लस्सी

पंजाब स्टाइलची मलईदार लस्सी करण्यासाठी 2 कप दही, 1 छोटा चमचा वेलची पूड, अर्धा कप थंडं दूध, 3 चमचे साय किंवा क्रीम, अर्ध कप साखर, 5-6 बर्फाचे तुकडे, पिस्त्याचे काप आणि केशर काड्या घ्याव्यात.

Image: Google

लस्सी करण्यासाठी सर्वात आधी भांड्यात दही आणि साखर घालून दही फेटून घ्यावं. दह्यात बर्फाचे तुकडे घालून पुन्हा दही फेटावं. दह्यात दूध आणि वेलची पूड घालून पुन्हा दही फेटावं. सर्वात शेवटी दह्यात साय किंवा क्रीम घालून दही फेटून घ्यावं.

Image: Google

ग्लास खाली ठेवून थोडी उंचावरुन एक धार लावून लस्सी ग्लासमध्ये ओतावी. लस्सीवर पिस्त्याचे काप आणि 1-2 केशर काड्या घालाव्या. बघितलं घरच्याघरी पंजाब स्टाइल लस्सी करणं किती सोपं आहे ते...

Web Title: Special Punjabi Recipe for Perfect Punjabi Lassi, Drink home made Lassi and be happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.