उन्हाळ्यात सतत काहीतरी थंडंगार खावंसं प्यावंसं वाटतं. बाहेर पडलं की लस्सी पिण्याची हुक्की हमखास येते. उन्हाळ्यात लस्सी पिणं आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीरही असते. पण घरच्या लस्सीला बाहेरच्या लस्सीसारखा दाटपणा येत नाही. त्यामुळे गोड ताक प्यायल्यासारखं वाटतं. पण घरच्याघरी पंजाबच्या स्टाइलची लस्सी केल्यास बाहेरची लस्सी प्यावीशी वाटणार नाही हे ही खरं. ही पंजाब स्टाइल लस्सी तयार करणं एकदम सोपं.
Image: Google
घरच्याघरी मलईदार लस्सी
पंजाब स्टाइलची मलईदार लस्सी करण्यासाठी 2 कप दही, 1 छोटा चमचा वेलची पूड, अर्धा कप थंडं दूध, 3 चमचे साय किंवा क्रीम, अर्ध कप साखर, 5-6 बर्फाचे तुकडे, पिस्त्याचे काप आणि केशर काड्या घ्याव्यात.
Image: Google
लस्सी करण्यासाठी सर्वात आधी भांड्यात दही आणि साखर घालून दही फेटून घ्यावं. दह्यात बर्फाचे तुकडे घालून पुन्हा दही फेटावं. दह्यात दूध आणि वेलची पूड घालून पुन्हा दही फेटावं. सर्वात शेवटी दह्यात साय किंवा क्रीम घालून दही फेटून घ्यावं.
Image: Google
ग्लास खाली ठेवून थोडी उंचावरुन एक धार लावून लस्सी ग्लासमध्ये ओतावी. लस्सीवर पिस्त्याचे काप आणि 1-2 केशर काड्या घालाव्या. बघितलं घरच्याघरी पंजाब स्टाइल लस्सी करणं किती सोपं आहे ते...