Join us  

तडकेवाला गाजर हलवा... एकदा खायलाच हवा, बघा या अस्सल पंजाबी पदार्थाची व्हायरल रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2022 4:39 PM

How To Make Tadkewala Gajrela: सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या काही रेसिपी खरोखरच छान आणि एकदम वेगळ्या असतात. त्यातलाच हा एक पदार्थ. तडकेवाला गजरेला म्हणजेच तडकेवाला गाजर हलवा...(Special Punjabi Recipe)

ठळक मुद्देगाजराचा हलवा तयार केल्यावर त्यापासून हा पदार्थ घरी करून बघायलाही सोपा आहे. बघा आवडला तर ट्राय करा.. 

थंडी सुरू झाली की बाजारात लाल चुटूक गाजर येतात आणि मग खवय्यांना गाजर का हलवा खाण्याचा मोह होतो. आतापर्यंत प्रत्येक घरी दोन- तीन वेळा तरी गाजराचा हलवा झाला असणारच. आता या हलव्यालाच अस्सल पंजाबी स्टाईलनी तडका देऊन तयार केलेला तडकेवाला गजरेला म्हणजेच तडका दिलेला गाजराचा हलवा ही रेसिपी सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल (Viral recipe of Tadkewala Gajrela) झाली आहे. पंजाबी स्टाईलची ही रेसिपी (Special Punjabi Recipe) नक्कीच चवीला कमाल असणार. त्यामुळे ही व्हायरल रेसिपी एकदा बघा आणि आवडला तर हा प्रयोग घरी करून बघा. (Gajar halwa)

आता पंजाबी पदार्थ म्हणजे दही, दूध, तूप आणि लोणी यांची बहार असते. या सगळ्या पदार्थांची तिथल्या पाककृतींमध्ये मुक्तहस्ते उधळण झालेली असते. तिथले घी वाले पराठे तर प्रसिद्धच..

करा फक्त ३ गोष्टी, २०२३ मध्ये डाएट- फिटनेस आणि शरीरासह मनाचेही आरोग्य राहील ठणठणीत 

आता गाजराचा हलवा करायचा म्हणजे त्यात दूध, तूप तर असणारच. पंजाबमध्ये तर त्यात जरा जास्तीचंच तूप आणि दूध असणार यात वादच नाही. तसाच पंजाबमध्ये भरपूर तूप घालून तयार केलेला गाजराचा हलवा म्हणजे तडकेवाला गजरेला. या चवदार पदार्थाची रेसिपी इन्स्टाग्रामच्या a_garnish_bowl_ या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

कसा करायचा तडकेवाला गजरेला?पंजाबमधील नाकोदर रोडवरील सहानी स्वीट्स इथे हा तडकेवाला गजरेला मिळतो. यामध्ये त्या शेफने गाजराचा हलवा भरपूर प्रमाणात करून ठेवलेला दिसतो. मोठ्या पॅनच्या एका कोपऱ्यात भरपूर तूप टाकलं.

न्यू इयर पार्टीसाठी कमी वेळात झटपट तयार व्हायचंय? ५ मेकअप टिप्स.. दिसाल एकदम सुंदर- स्टायलिश

त्या तूपात काजू आणि मनुका टाकून परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये तयार केलेला गाजराचा हलवा टाकला. त्यात तेवढाच खवा टाकला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून वाफवून घेतलं आणि झाला तयार तडकेवाला गजरेला. गाजराचा हलवा तयार केल्यावर त्यापासून हा पदार्थ घरी करून बघायलाही सोपा आहे. बघा आवडला तर ट्राय करा.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पंजाब