थंडीच्या दिवसांत रात्री जेवणात जर खिचडी किंवा पराठे असतील, तर त्याच्यासोबत प्यायला गरमागरम कढी छानच लागते. शिवाय थंडीच्या दिवसांत (winter special recipe) गरमागरम कढी पिण्याची मजा तर काही औरच. एरवी आपण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने कढी करतोच. प्रत्येक घराच्या परंपरेनुसार त्यात लागणारे पदार्थ थोड्या- फार फरकाने वेगवेगळे असले तरी शेवटी रेसिपी एकाच धाटणीची असते. त्यामुळे आता आपल्या नेहमीच्या कढी रेसिपीपेक्षा खूप वेगळी रेसिपी वापरून अतिशय चवदार अशी राजस्थानी कढी (Special Rajasthani Kadhi Recipe) करून बघा. जेवणाची चव नक्कीच वाढेल. ही रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (celebrity chef Kunal Kapoor) यांनी साेशल मिडियावर शेअर केली आहे.
राजस्थानी कढी रेसिपी
साहित्य
दिड कप दही
४ टेबलस्पून बेसन
चवीनुसार मीठ
पाऊण टी स्पून हळद
५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या सुंदर- डिझायनर काळी साडी, बघा स्वस्तात मस्त ३ पर्याय
चवीनुसार तिखट
५ कप पाणी
फोडणीसाठी तेल
२ वाळलेल्या लाल मिरच्या
३ तेजपत्ता
अर्धा टिस्पून मेथी दाणा
चिमुटभर हिंग
२ टीस्पून मोहरी
४ ते ५ लवंग
२ टीस्पून धने
करिश्मा तन्नाचं जबरदस्त वर्कआऊट, ‘इतका’ अवघड व्यायाम, पाहतच राहावे- व्हायरल व्हिडिओ
२ टीस्पून जीरे
२ टीस्पून बडिशेप
६ ते ७ कढीपत्त्याची पाने
१ हिरवी मिरची
१ टीस्पून किसलेलं आलं
२ टेबलस्पून तूप
१ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
कृती
१. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये दही आणि बेसन एकत्र करा आणि व्यवस्थित फेटून घ्या. जेणेकरून त्यात एकही गाठ राहणार नाही. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, तिखट आणि पाणी टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्या.
२. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. आवडत असेल तर तेल वगळून तुपाची फोडणीही करू शकता.
३. तेल गरम झाल्यानंतर त्यात जीरे, मोहरी, धने, बडिशेप आणि हिंग टाकून फोडणी करून घ्या.
४. फोडणी तडतडली की तेजपत्ता, लवंग, कढीपत्ता, मिरच्या आणि आलं टाका.
५. फोडणीतील पदार्थांचा कच्चेपणा कमी झाला की त्यात कालवलेलं दही आणि बेसन यांचं मिश्रण टाका आणि त्याला चांगली उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.
६. आता एका छोट्या कढईमध्ये तूप गरम करा. तुप तापलं की त्यात लाल तिखट घाला आणि हे तिखट वरतून कढीवर टाका. राजस्थानी स्टाईलची गरमागरम कढी तयार.