Join us  

स्पेशल राजस्थानी कढी! चव अशी की अहाहा.... पाहा कुणाल कपूर यांची खास रेसिपी, हिवाळ्यातला गरमागरम बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2023 1:03 PM

Special Rajasthani Kadhi Recipe: एरवी आपण नेहमीच कढी करतो. पण यंदा ही राजस्थानी स्टाईलची कढी करून बघा. जेवणात नक्कीच रंगत येईल.

ठळक मुद्देआपल्या नेहमीच्या कढी रेसिपीपेक्षा खूप वेगळी रेसिपी वापरून अतिशय चवदार अशी राजस्थानी कढी करून बघा. जेवणाची चव नक्कीच वाढेल.

थंडीच्या दिवसांत रात्री जेवणात जर खिचडी किंवा पराठे असतील, तर त्याच्यासोबत प्यायला गरमागरम कढी छानच लागते. शिवाय थंडीच्या दिवसांत (winter special recipe) गरमागरम कढी पिण्याची मजा तर काही औरच. एरवी आपण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने कढी करतोच. प्रत्येक घराच्या परंपरेनुसार त्यात लागणारे पदार्थ थोड्या- फार फरकाने वेगवेगळे असले तरी शेवटी रेसिपी एकाच धाटणीची असते. त्यामुळे आता आपल्या नेहमीच्या कढी रेसिपीपेक्षा खूप वेगळी रेसिपी वापरून अतिशय चवदार अशी राजस्थानी कढी (Special Rajasthani Kadhi Recipe) करून बघा. जेवणाची चव नक्कीच वाढेल. ही रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (celebrity chef Kunal Kapoor) यांनी साेशल मिडियावर शेअर केली आहे.राजस्थानी कढी रेसिपीसाहित्यदिड कप दही४ टेबलस्पून बेसनचवीनुसार मीठपाऊण टी स्पून हळद

५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या सुंदर- डिझायनर काळी साडी, बघा स्वस्तात मस्त ३ पर्यायचवीनुसार तिखट५ कप पाणीफोडणीसाठी तेल२ वाळलेल्या लाल मिरच्या३ तेजपत्ता

अर्धा टिस्पून मेथी दाणाचिमुटभर हिंग२ टीस्पून मोहरी४ ते ५ लवंग२ टीस्पून धने

करिश्मा तन्नाचं जबरदस्त वर्कआऊट, ‘इतका’ अवघड व्यायाम, पाहतच राहावे- व्हायरल व्हिडिओ२ टीस्पून जीरे२ टीस्पून बडिशेप६ ते ७ कढीपत्त्याची पाने१ हिरवी मिरची१ टीस्पून किसलेलं आलं२ टेबलस्पून तूप१ टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर  

कृती१. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये दही आणि बेसन एकत्र करा आणि व्यवस्थित फेटून घ्या. जेणेकरून त्यात एकही गाठ राहणार नाही. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, तिखट आणि पाणी टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्या.२. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. आवडत असेल तर तेल वगळून तुपाची फोडणीही करू शकता.३. तेल गरम झाल्यानंतर त्यात जीरे, मोहरी, धने, बडिशेप आणि हिंग टाकून फोडणी करून घ्या.४. फोडणी तडतडली की तेजपत्ता, लवंग, कढीपत्ता, मिरच्या आणि आलं टाका.५. फोडणीतील पदार्थांचा कच्चेपणा कमी झाला की त्यात कालवलेलं दही आणि बेसन यांचं मिश्रण टाका आणि त्याला चांगली उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.६. आता एका छोट्या कढईमध्ये तूप गरम करा. तुप तापलं की त्यात लाल तिखट घाला आणि हे तिखट वरतून कढीवर टाका. राजस्थानी स्टाईलची गरमागरम कढी तयार.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.