Lokmat Sakhi >Food > आंध्रा स्टाईलने आवळ्याचं लोणचं करण्याची चटपटीत रेसिपी- एकदा चाखून बघाच ही न्यारी चव

आंध्रा स्टाईलने आवळ्याचं लोणचं करण्याची चटपटीत रेसिपी- एकदा चाखून बघाच ही न्यारी चव

Andhra Style Amla Pickle Recipe: आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने आवळ्याचं लोणचं आपण नेहमीच करतो. आता एकदा आंध्रा स्टाईलने आवळ्याचं लोणचं घालून पाहा... (usirikaya pachadi recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2024 11:02 AM2024-02-10T11:02:55+5:302024-02-10T11:04:32+5:30

Andhra Style Amla Pickle Recipe: आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने आवळ्याचं लोणचं आपण नेहमीच करतो. आता एकदा आंध्रा स्टाईलने आवळ्याचं लोणचं घालून पाहा... (usirikaya pachadi recipe)

Special recipe of amla achar from Andhra Pradesh, How to make amla pickle by Andhra style, Andhra style gooseberry pickle recipe, usirikaya pachadi recipe | आंध्रा स्टाईलने आवळ्याचं लोणचं करण्याची चटपटीत रेसिपी- एकदा चाखून बघाच ही न्यारी चव

आंध्रा स्टाईलने आवळ्याचं लोणचं करण्याची चटपटीत रेसिपी- एकदा चाखून बघाच ही न्यारी चव

Highlightsजेवणातली रंगत आणखी वाढवायची असेल तर एकदा आंध्र प्रदेशच्या स्टाईलने आवळ्याचं लोणचं घालून पाहा

सध्या आवळ्याचे दिवस आहेत. आवळा अधिकाधिक पौष्टिक असल्याने शिवाय या दिवसांतच तो मिळत असल्याने हेल्थ फ्रिक मंडळी आवर्जून आवळा खातात. काही हौशी गृहिणी आवळ्याचं लोणचं, मुरांबा, कॅण्डी असे पदार्थ करून ठेवतात. आवळ्याचं आंबट, गोड, तुरट चवीचं लोणचं जेवणात असलं की जेवणाची रंगत खरोखरच आणखी वाढते. आता जेवणातली हीच रंगत आणखी वाढवायची असेल तर एकदा आंध्र प्रदेशच्या स्टाईलने आवळ्याचं लोणचं घालून पाहा (Special recipe of amla achar from Andhra Pradesh). या लोणच्याची चव खरोखरच लाजवाब असते (How to make amla pickle by Andhra style). एकदा जर तुम्ही या लोणच्याची चव घेऊन पाहिली, तर दरवर्षी अगदी आवर्जून हे आंध्रा स्टाईल आवळ्याचं लोणचं घालाल... (Andhra style gooseberry pickle recipe)

आंध्रा स्टाईलने आवळ्याचं लोणचं करण्याची रेसिपी

 

उसिरीकाया पचडी usirikaya pachadi या नावाने तिकडे हे आवळ्याचं लोणचं ओळखलं जातं. तिकडे विशेषत: भातासोबत हे लोणचं खाल्लं जातं. 

साहित्य

९- १० आवळे

अर्धी वाटी तिळाचं तेल

व्यायाम न करता वजन कमी करायचंय? मग 'हे' ६ पदार्थ खा- वजन नेहमीच राहील आटोक्यात

अर्धी वाटी चिंचेचा कोळ

१ टेबलस्पून मेथी दाणा

१ टेबलस्पून मोहरी

लसूणाच्या १५ ते २० पाकळ्या

५ ते ६ वाळलेल्या लाल मिरच्या

कडीपत्त्याची ८ ते १० पाने 

चवीनुसार मीठ आणि लाल तिखट

अर्धा टेबलस्पून हळद

 

कृती

१. सगळ्यात आधी आवळे स्वच्छ धुवून काेरडे करून घ्या.

२. यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालं की त्यात आवळे, लसूणाच्या पाकळ्या टाकून डिप फ्राय करून घ्या. यानंतर कढईवर झाकण ठेवून थोडी वाफ येऊ द्या आणि त्यानंतर गॅस बंद करून टाका.

रविना टंडनने सांगितली तिच्या आईची खास रेसिपी- तुपाच्या बेरीपासून बघा कशी करायची मिठाई

३. त्यानंतर पोटॅटो मॅशरने आवळ्याला हलकासा दाब द्या. आपल्याला आवळ्याचे तुकडे करायचे नाहीत. आवळ्याचे तोंड फक्त थोडे मोकळे करायचे आहे, जेणेकरून अधिकाधिक मसाला आवळ्यांमध्ये जाऊन लोणचं अधिक चवदार होईल.

४. चिंचेचा कोळ काढून तो देखील थोड शिजवून घ्या. 

 

५. कढईमध्ये मोहरी, मेथीदाणे टाकून थोडे भाजून घ्या. लाल मिरच्याही थोड्या गरम करून घ्या.

६. यानंतर मोहरी आणि मेथीदाणे मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर करून घ्या.

व्हॅलेन्टाईन्स डे ला स्पेशल दिसायचंय? बॉलीवूड सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स- करा एकदम 'किलर' लूक

७. आता आवळे ज्या कढईमध्ये आहेत त्यात लोणचं मसाला, चिंचेचा कोळ, लाल मिरच्या, कडीपत्ता, हळद, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाका आणि सगळं लोणचं व्यवस्थित हलवून घ्या.

८. यानंतर हे लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवा. ३ ते ४ दिवसांतच लोणचं खूप छान मुरेल. 


 

Web Title: Special recipe of amla achar from Andhra Pradesh, How to make amla pickle by Andhra style, Andhra style gooseberry pickle recipe, usirikaya pachadi recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.