Lokmat Sakhi >Food > बिर्याणीची खास चव, मिळेल फ्लॉवर बिर्याणीतही! वीकेंडला करा बिर्याणीचं सेलिब्रेशन

बिर्याणीची खास चव, मिळेल फ्लॉवर बिर्याणीतही! वीकेंडला करा बिर्याणीचं सेलिब्रेशन

वीकेंडला पूर्ण स्वयंपाकाचा कंटाळा आला तर करा झटपट फ्लॉवर बिर्याणी..सगळ्यांना आवडेल असा हेल्दी आणि टेस्टी पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 02:00 PM2022-02-13T14:00:01+5:302022-02-13T14:20:42+5:30

वीकेंडला पूर्ण स्वयंपाकाचा कंटाळा आला तर करा झटपट फ्लॉवर बिर्याणी..सगळ्यांना आवडेल असा हेल्दी आणि टेस्टी पर्याय...

Special taste of biryani, also found in flower biryani! Celebrate biryani on weekends | बिर्याणीची खास चव, मिळेल फ्लॉवर बिर्याणीतही! वीकेंडला करा बिर्याणीचं सेलिब्रेशन

बिर्याणीची खास चव, मिळेल फ्लॉवर बिर्याणीतही! वीकेंडला करा बिर्याणीचं सेलिब्रेशन

Highlightsझटपट होणारी आणि खायलाही चविष्ट अशी बिर्याणी वीकेंडला नक्की ट्राय करु शकता...भाज्यांमुळे पौष्टीकताही वाढण्यास होईल मदत, घरातील सगळेच होतील खूश

विकेंड म्हटलं की आठवड्याचा सगळा शीण घालवण्यासाठी आराम करणे असे समीकरण असते. पण हे घरातील महिलांसाठी मात्र नाही. कारण आठवड्याचे दिवस परवडले पण विकेंड नको असे अनेकींना वाटू शकते. जास्तीची साफसफाईची कामे, घरातील सगळ्यांच्या खाण्याच्या वेगवेगळ्या फर्माईशी, सुट्टी म्हणून घरी येणारे पाहुणे यामुळे एक सुट्टी मिळते आणि तीही पूर्ण कामात जाते. अशावेळी तुम्हाला झटपट सगळ्यांना आवडेल, पोट भरेल आणि कमी काम पडेल असा मेन्यू करायचा असेल तर आम्ही एक सोपा पर्याय सुचवणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ थोडे नियोजन केले तर तुम्ही अगदी झटपट तयार करु शकता. भात हा भारतातील बहुतांश भागात महत्त्वाते खाद्य. त्यातही या भाताचे वेगवेगळे प्रकार म्हणजे पाहायलाच नको...गरमागरम खिचडीपासून ते लज्जतदार बिर्याणीपर्यंत (Biryani) भाताचे एक ना अनेक प्रकार पाहायला मिळतात. करायला सोपा, पचायला हलका आणि सगळ्यांना आवडणारे हे प्रकार सर्रास खाल्ले जातात. 

भारतात मागील वर्षात बिर्याणी हा सर्वाधिक ऑनलाईन ऑर्डर केला गेलेला पदार्थ होता. म्हणजे देशभरात विविध भागातील लोक बिर्याणी खायला पसंती देत असल्याचे यातून लक्षात येते. कधी घरी पाहुणे येणार म्हणून किंवा कधी काही खास सेलिब्रेशन असेल तर किंवा आपल्याला पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर झटपट होणारी बिर्याणी हा बेस्ट पर्याय असतो. आता बिर्याणी म्हणजे केवळ नॉनव्हेजच असे नाही बरं का तर व्हेजमध्येही वेगवेगळ्या चवींची बिर्याणी (Veg Biryani) आपण नक्की ट्राय करु शकतो. यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केला तर ती टेस्टी तर होतेच पण पौष्टीकही होते. तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खाऊ शकतील अशा फ्लॉवर बिर्याणीची एक खास रेसिपी पाहणार आहोत. 

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य -

१. बटर - २ चमचे 
२. कांदा - १ मोठा चिरलेला
३. तांदूळ - ३ वाट्या 
४. चिरलेल्या भाज्या - ३ वाट्या (मटार, गाजर, शिमला मिर्ची, बटाटा, फरसबी, फ्लॉवर)  
५. आलं लसूण पेस्ट - २ चमचे
६. धने-जीरे पावडर - २ चमचे
७. गरम मसाला - १ चमचा
८. बिर्याणी मसाला - १ चमचा 
९. दही - १ वाटी
१०. मीठ - चवीप्रमाणे

(Image : Google)
(Image : Google)

कृती -

१. भात कूकरमध्ये कमी पाणी घालून फडफडीत शिजवून घेणे 

२. सगळ्या भाज्या बारीक चिरुन ठेवणे

३. एका कढईत बटर घालून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालावी. परतल्यावर त्यामध्ये सगळ्या भाज्या आणि दही घालावे.

४. गरम मसाला, बिर्याणी मसाला, धने-जीरे पावडर, मीठ घालून सगळे एकजीव करुन घ्यावे

५. या भाज्यांना थोडी वाफ येऊ द्यावी. ही भाजी जास्त पातळ होऊ नये यासाठी शक्यतो घट्टसर दही वापरावे. 

६. एक पातेले घेऊन त्यामध्ये खाली शिजलेला भात, त्यावर भाजी, त्यावर पुन्हा भात आणि भाजी असे साधारण ३ थर लावावेत. 

७. यावर तळलेला कांदा आणि कोथिंबिर घालून सजावट करावी. आवडीप्रमाणे तळलेले काजू किंवा इतर सुकामेवाही घालू शकता. 

८. ही बिर्याणी खायला तर चविष्ट लागतेच पण भाज्यांमुळे त्याचे पोषणमूल्यही वाढते. थंडीच्या दिवसांत अशी गरमागरम बिर्याणी सोबत एखादे रायते किंवा चिरलेली कांदा, काकडी घेतली तरी उत्तम 
 

Web Title: Special taste of biryani, also found in flower biryani! Celebrate biryani on weekends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.