Lokmat Sakhi >Food > काही केल्या पुऱ्या फुगतच नाहीत? पुऱ्या टम्म फुगण्यासाठी ६ सोप्या ट्रिक्स; सणावाराचा बेत होईल झक्कास..

काही केल्या पुऱ्या फुगतच नाहीत? पुऱ्या टम्म फुगण्यासाठी ६ सोप्या ट्रिक्स; सणावाराचा बेत होईल झक्कास..

Special Tips For Perfect Puri by Chef Kunal Kapoor : पुऱ्या मस्त टम्म फुगण्यासाठी पीठ मळताना, पुऱ्या लाटताना, तळताना काय करायचं हे समजून घ्यायला हवं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2023 11:36 AM2023-09-03T11:36:55+5:302023-09-03T12:27:15+5:30

Special Tips For Perfect Puri by Chef Kunal Kapoor : पुऱ्या मस्त टम्म फुगण्यासाठी पीठ मळताना, पुऱ्या लाटताना, तळताना काय करायचं हे समजून घ्यायला हवं.

Special Tips For Perfect Puri by Chef Kunal Kapoor : 6 easy tricks to get a Fluffy Puri; The plan of the festival will be Perfect.. | काही केल्या पुऱ्या फुगतच नाहीत? पुऱ्या टम्म फुगण्यासाठी ६ सोप्या ट्रिक्स; सणावाराचा बेत होईल झक्कास..

काही केल्या पुऱ्या फुगतच नाहीत? पुऱ्या टम्म फुगण्यासाठी ६ सोप्या ट्रिक्स; सणावाराचा बेत होईल झक्कास..

श्रावण महिना म्हणजे सणावारांची रेलचेल. सत्यनारायणाची पूजा, मंगळागौर, शुक्रवारची सवाष्ण आणि राखीपौर्णिमा यांसारखे सणवार या काळात असतात. यावेळी आपण पुरी भाजीचा बेत आवर्जून करतो. पण या पुऱ्या छान फुगल्या नाहीत तर जेवणाची मज्जाच राहत नाही. कधी पुऱ्या खूप तेल पितात तर कधी अजिबात फुगत नाहीत आणि वातड होतात अशावेळी जेवणाची मज्जाच जाते. पुरी भाजी किंवा श्रीखंड पुरी हा बेत परफेक्ट होण्यासाठी पुऱ्या छान फुगायला हव्यात. मग या पुऱ्या मस्त टम्म फुगण्यासाठी पीठ मळताना, पुऱ्या लाटताना, तळताना काय करायचं हे समजून घ्यायला हवं. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर आपल्याला याविषयीच्या काही खास टिप्स देतात (Special Tips For Perfect Puri by Chef Kunal Kapoor). 

१. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण कणीक घेतो आणि त्यात पाणी आणि मीठ घालून ती मळतो. पण पुऱ्या करताना कणीक डायरेक्ट न घेता ती चाळून घ्यावी. म्हणजे त्यामध्ये काही गठ्ठे किंवा जाडसर राहीले असेल तर ते निघून जाण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. पुऱ्यांची कणीक नेहमीसारखी मऊसर न भिजवता चांगली घट्टसर भिजवावी. कणीक घट्ट असेल तर पुऱ्या चांगल्या होतात आणि फुगण्यासही मदत होते. 

३. पुऱ्या चांगल्या होण्यासाठी कणीक भिजवल्यानंतर त्यावर एक ओले कापड घालून ठेवावे. म्हणजे कणीक चांगली मुरण्यास मदत होते. 

४. यानंतर कणकेचे एकसारखे लहान गोळे करुन घ्यावेत. या गोळ्यांच्या खालच्या बाजूला कुठेही चिरा पडणार नाहीत असे पाहावे. तसेच या गोळ्यांवर तेल घालून ठेवावे म्हणजे ते गोळे कडक होणार नाहीत. 


५. पुऱ्या लाटण्यासाठी लाटण्याला भेगा असता कामा नयेत. लाटणं मऊ राहण्यासाठी लाटण्यालाही सगळ्या बाजूने तेल लावून घ्यावे.

६. पुरी लाटताना ती सगळ्या बाजूने एकसारखी लाटली जायला हवी. विशेषत: काठांच्या बाजूने पुरी एकसारखी लाटली गेली तर पुरी तेलात घातल्यावर छान फुगते.  

Web Title: Special Tips For Perfect Puri by Chef Kunal Kapoor : 6 easy tricks to get a Fluffy Puri; The plan of the festival will be Perfect..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.