सकाळी सगळ्यांचीच गडबड असते. त्यामुळे नाश्त्यामध्ये होणारा पदार्थ कसा झटपट होणारा आणि फटाफट खाता येणारा पाहिजे.. चव तर चांगली पाहिजेच पण तो हेल्दीही (healthy recipe) हवाच.. या सगळ्या गोष्टी एकाच पदार्थातून मिळवायच्या असतील तर स्प्राऊट चाट रेसिपी (sprout chaat recipe) ट्राय करून बघायला हरकत नाही. ही रेसिपी करण्यासाठी आधीपासून खूप काही तयारीही करावी लागत नाही. त्यामुळे कधीतरी एकदा स्वत:साठी आणि घरच्यांसाठी हा पदार्थ करून बघाच.. ही स्प्राऊट चाट रेसिपी इन्स्टाग्रामच्या thepink.apron या पेजवर शेअर करण्यात आली आहे..
स्प्राऊट चाट करण्यासाठी लागणारे साहित्य
१ कप उकडलेली किंवा मोड आलेली मिक्स कडधान्ये, पाण्यात भिजवलेले किंवा उकडलेले शेंगदाणे पाव कप, टोमॅटो, कांदा पाव- पाव कप, डाळिंबाचे दाणे पाव कप, दोन टेबलस्पून बारिक चिरलेली कोथिंबीर, १ टी स्पून लिंबाचा रस, १ टी स्पून रॉक सॉल्ट किंवा काळे मीठ, चवीनुसार मीठ आणि तिखट, १ टीस्पून चाट मसाला.
कसे करायचे स्प्राऊट चाट (how to make sprout chaat)
- ज्यांना मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्ल्याने त्रास होत नाही, त्यांनी ती कच्चीच खावीत. ज्यांना त्रास होतो त्यांनी ती उकडून घ्यावीत.
- कडधान्ये, टोमॅटो, कांदा एका बाऊलमध्ये टाकावा.
- त्यात इतर मसाले, मीठ टाकावे
- त्यानंतर त्यावर लिंबाचा रस टाकावा व नंतर कोथिंबीर टाकून सगळे मिश्रण हलवून घ्यावे.
- हेल्दी स्प्राऊट चाट रेसिपी तयार.
कडधान्यं खाण्याचे फायदे
(benefits of eating sprouts)
- मोड आलेल्या धान्यांमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि के भरपूर प्रमाणात असतात.
- याशिवाय कडधान्यातून आपल्याला कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह, फायबर, ओमेबा ३ फॅटी ॲसिड देखील भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे कडधान्ये असलेला नाश्ता करणे कधीही आरोग्यासाठी उत्तमच..
- कडधान्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वेटलॉस करणाऱ्यांसाठी हा एक चांगला नाश्ता मानला जातो.