Lokmat Sakhi >Food > कच्च्या केळीचे करा खमंग तिखट काप, १० मिनिटात चविष्ट पौष्टिक खाऊ तयार!

कच्च्या केळीचे करा खमंग तिखट काप, १० मिनिटात चविष्ट पौष्टिक खाऊ तयार!

Spicy and Crispy Banana Tawa Fry कच्च्या केळीचे चटपटीत काप, चव अशी की करेल दिल खुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2023 03:09 PM2023-05-03T15:09:22+5:302023-05-03T15:10:04+5:30

Spicy and Crispy Banana Tawa Fry कच्च्या केळीचे चटपटीत काप, चव अशी की करेल दिल खुश

Spicy and Crispy Banana Tawa Fry | कच्च्या केळीचे करा खमंग तिखट काप, १० मिनिटात चविष्ट पौष्टिक खाऊ तयार!

कच्च्या केळीचे करा खमंग तिखट काप, १० मिनिटात चविष्ट पौष्टिक खाऊ तयार!

केळी हे पौष्टीक्तेने परिपूर्ण फळ आहे. केळी बाजारात बाराही महिने उपलब्ध असतात. कच्च्या केळीसह पिकलेल्या केळीचे देखील अनेक पदार्थ केले जातात. केळी फक्त आरोग्यासाठी नाहीच तर, त्वचा व केसांसाठी देखील उपयुक्त ठरते. पोटॅशियम, जस्त, लोह यांसारख्या खनिजांसोबतच केळी हे ऊर्जेचा एक मजबूत स्त्रोत आहे, ज्यामध्ये अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अनेक जण केळी खाण्याचा सल्ला देतात.

कच्च्या केळींचे आतापर्यंत आपण अनेक पदार्थ खाल्ले असतील. बनाना वेफर्स, कच्च्या केळीची भाजी, कच्च्या केळीची भजी, पण आपण कधी कच्च्या केळीचे काप खाल्ले आहे का? चमचमीत तिखट चवीचे हे काप, जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी अप्रतिम लागतात(Spicy and Crispy Banana Tawa Fry).

केळीचे काप करण्यासाठी लागणारं साहित्य

कच्चे केळी

आलं - लसूण पेस्ट

उन्हाळ्यात करा विकतसारखे ऑरेंज पॉप्सिकल, कमी साहित्यात १० मिनिटात - गारेगार पॉप्सिकल रेडी

हळद

लाल तिखट

मीठ

लिंबाचा रस

रवा

तेल

केळीचे काप करण्याची कृती

सर्वप्रथम, कच्च्या केळीचे साल काढून घ्या, आपण यासाठी चाकूचा देखील वापर करू शकता. केळीचे साल काढून झाल्यानंतर त्याचे लांब आकाराचे काप करून घ्या. काप करून झाल्यानंतर, एका कापडाच्या मदतीने केळीचे काप पुसून घ्या. आता एका बाऊलमध्ये आलं - लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, व लिंबाचा रस घालून साहित्य एकत्र मिक्स करा.

आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून ४ टिप्स, रस दिसेल पिवळाजर्द-चवही राहील परफेक्ट

मिश्रण मिक्स झाल्यानंतर केळीच्या कापांना ही पेस्ट लावा, व काही मिनिटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवा. दुसरीकडे एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ, रवा व चवीनुसार मीठ घेऊन एकत्र मिक्स करा. आता केळीच्या मॅरिनेशनवर या पीठाचे कोटिंग करा.

एकीकडे पॅनमध्ये तेल घालून गरम करण्यसाठी ठेवा. त्या तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत केळीचे काप तळून किंवा भाजून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत खमंग केळीचे काप खाण्यासाठी रेडी.

Web Title: Spicy and Crispy Banana Tawa Fry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.