Lokmat Sakhi >Food > रताळ्याचे कुरकुरीत खमंग काप खाऊन तर पाहा, साधा वरणभात आणि रताळ्याचे काप - पावसाळ्यात मस्त बेत...

रताळ्याचे कुरकुरीत खमंग काप खाऊन तर पाहा, साधा वरणभात आणि रताळ्याचे काप - पावसाळ्यात मस्त बेत...

Maharashtrian Style Sweet Potato Fry : कच्ची केळी, बटाटा, सुरणाचे काप तर आपण नेहमी खातोच, एकदा रताळ्याचे चमचमीत काप नक्की ट्राय करुन पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 03:50 PM2024-06-24T15:50:31+5:302024-06-24T16:02:12+5:30

Maharashtrian Style Sweet Potato Fry : कच्ची केळी, बटाटा, सुरणाचे काप तर आपण नेहमी खातोच, एकदा रताळ्याचे चमचमीत काप नक्की ट्राय करुन पाहा...

Spicy Ratalyache kaap Crispy Sweet Potato Maharashtrian Style Sweet Potato Fry How To Make Ratalyache Kaap | रताळ्याचे कुरकुरीत खमंग काप खाऊन तर पाहा, साधा वरणभात आणि रताळ्याचे काप - पावसाळ्यात मस्त बेत...

रताळ्याचे कुरकुरीत खमंग काप खाऊन तर पाहा, साधा वरणभात आणि रताळ्याचे काप - पावसाळ्यात मस्त बेत...

बरेचदा उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी रताळं हा एक मुख्य पदार्थ आहे. अशावेळी रताळं उकडवून किंवा त्याचा किस करून तसेच गोड काप करून खाल्ले जातात. उपवासाशिवाय रताळं आवर्जून आणून खाल्लं जात नाही. काहीजणांना रताळं खायला आवडत नाही. परंतु हेच रताळं वापरुन जर आपण काही चटपटीत , मसालेदार असं काही बनवलं तर ते पटापट आवडीने खाल्लं जात(Spicy Ratalyache kaap).

रताळ्यामधे अनेक पोषक तत्वे देखील असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत. यात अनेक पोषक तत्वे असतात फायबर, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचे प्रमाण रताळ्यांमध्ये जास्त असते. आत्तापर्यंत आपण रताळ्याची पुरी, रताळ्याचा किस, रताळ्याचा शिरा असे अनेक गोड पदार्थ खालले असतील. रताळल्यापासून तयार केल्या जाणाऱ्या तिखट पदार्थांमध्ये रताळ्याचे कुरकुरीत, खमंग काप खायला टेस्टी लागतात. साध्या वरण भातासोबतही हे काप तोंडी लावायला छान लागतात. रताळ्याचे तिखट काप बनवण्याची सोपी रेसिपी पाहुयात(How To Make Ratalyache Kaap)   

साहित्य :- 

१. रताळ - १ 
२. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 
३. हळद - चिमूटभर 
४. धणेपूड - १ टेबलस्पून 
५. मीठ - चवीनुसार 
६. बारीक रवा - १ कप 
७. जिरेपूड - १ टेबलस्पून 
८. तेल - गरजेनुसार 
९. तांदुळाचे पीठ - १ कप 

मुलांचा शाळेचा डबा पौष्टिक आणि चविष्ट करण्यासाठी १ खास टिप, खुद्द रणबीर ब्रार सांगतो..

कापसाहून मऊ, जाळीदार लोणी डोसा बनवण्याची पारंपरिक रेसिपी, पाहा एकदम सोपी पद्धत-डोसा परफेक्ट...

कृती :- 

१. सगळ्यात आधी रताळ्याची साल संपूर्ण काढून घ्यावी, त्यानंतर रताळ्याचे गोलाकार मध्यम जाडीचे काप करुन घ्यावेत. 
२. हे काप एका बाऊलमध्ये घेऊन त्यात तेल घालावे. तेल सगळ्या कापांना लागेल असे व्यवस्थित ढवळून घ्यावे. 
३. त्यानंतर त्यात लाल तिखट मसाला, हळद, धणेपूड, मीठ, जिरेपूड घालावे. 
४. या सगळ्या तयार मिश्रणात काप व्यवस्थित मॅरीनेट करुन घ्यावेत. 

महागामोलाच्या लिची पावसाळ्यात खराब होतात, ३ सोप्या ट्रिक्स- लिची भरपूर टिकतील-सडणार नाहीत...

५. आता एका डिशमध्ये बारीक रवा, तांदुळाचे पीठ घेऊन ते मिक्स करून घ्यावेत. 
६. मॅरीनेट करून घेतलेले काप या बारीक रवा आणि तांदुळ पिठाच्या एकत्रित मिश्रणात घोळवून घ्यावेत. 
७. एका पॅनमध्ये तेल घेऊन हे काप दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावेत. 

रताळ्याचे काप खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: Spicy Ratalyache kaap Crispy Sweet Potato Maharashtrian Style Sweet Potato Fry How To Make Ratalyache Kaap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.