जेवणाच्या ताटात आपल्या चपाती - भाजी आणि डाळ - भात असतेच (Chutney). याव्यतिरिक्त काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत, तिखट खाण्याची इच्छा झाली तर, आपण लोणचं किंवा चटणी खातो (Food). लोणचं रोज रोज खायला सर्वांनाच आवडतं असं नाही (Cooking Tips). चटणी देखील कुरकुरीत असेल तर, खाण्यात मज्जा आहे.
जर आपल्याला कुरकुरीत आणि झणझणीत पौष्टीक चटणी खायची असेल तर, भाजलेला शेंगदाणा आणि लसणाची चटणी करून खा. ही चटणी अगदी कमीत कमी वेळात तयार होईल आणि जास्त मेहनतही घ्यावी लागणार नाही. चला तर मग शेंगदाणा - लसणाची कुरकुरीत चटणी कशी करायची? पाहूयात(Spicy Red Peanut Chutney Recipe to Increase the Taste of Your Regular Meals).
शेंगदाणा - लसणाची कुरकुरीत चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य
लाल सुक्या मिरच्या
शेंगदाणे
लसूण
मीठ
आमचूर पावडर
साबुदाणा वडे तेल फार पितात - तळताना फुटतात? १ ट्रिक - वडे होतील परफेक्ट, प्रमाण चुकणार नाही..
जिरं
हिंग
कृती
सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक कप लाल सुक्या मिरच्या, एक कप शेंगदाणे, ७ - ८ लसणाच्या पाकळ्या घालून वाटून घ्या. एका पॅनमध्ये २ चमचे तेल घालून गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं आणि चिमुटभर हिंग घाला. नंतर त्यात लाल सुक्या मिरच्या, शेंगदाणे आणि लसणाचे वाटण घालून परतवून घ्या.
गव्हाची पोळी पचत नाही? पोट फुगल्यासारखं वाटतं? कणकेत घाला २ गोष्टी; चपात्या होतील मऊ
काही वेळानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालून मिक्स करा. शेवटी एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. अशा प्रकारे शेंगदाणा - लसणाची कुरकुरीत चटणी खाण्यासाठी रेडी.