Lokmat Sakhi >Food > कपभर गव्हाच्या पीठाचे करा चमचमीत धिरडे; शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय, १५ मिनिटांत चमचमीत पदार्थ

कपभर गव्हाच्या पीठाचे करा चमचमीत धिरडे; शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय, १५ मिनिटांत चमचमीत पदार्थ

Spicy Wheat Flour Dhirde Recipe; make in 15 minutes : पराठा, चपाती नेहमीचीच; चमचमीत खायचं असेल तर, धिरडे करून खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2024 05:02 PM2024-06-19T17:02:17+5:302024-06-19T17:03:26+5:30

Spicy Wheat Flour Dhirde Recipe; make in 15 minutes : पराठा, चपाती नेहमीचीच; चमचमीत खायचं असेल तर, धिरडे करून खा..

Spicy Wheat Flour Dhirde Recipe; make in 15 minutes | कपभर गव्हाच्या पीठाचे करा चमचमीत धिरडे; शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय, १५ मिनिटांत चमचमीत पदार्थ

कपभर गव्हाच्या पीठाचे करा चमचमीत धिरडे; शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय, १५ मिनिटांत चमचमीत पदार्थ

चपाती, पोळी, रोटी या तिन्ही नावाने प्रसिद्ध असलेला पदार्थ आपण दररोज खातो (Dhirde Recipe). चपाती आपण भाजी अथवा चटणीसोबत खातो. पण पोळी करण्याची प्रोसेस मोठी असते (Food). कणिक मळण्यापासून ते चपाती लाटून शेकण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी केल्यानंतर चपाती तयार होते (Cooking Tips). कणिक नीट मळले गेल्यावरच चपाती मऊ आणि लुसलुशीत तयार होते.

आपण टिफिनमध्येही चपाती देतो. पण जर मुलांना चपातीव्यतिरिक्त काहीतरी हटके खायचं असेल तर, गव्हाच्या पीठाचे धिरडे तयार करा. ना लाटायची झंझट ना भाजायची, अगदी १५ मिनिटात गव्हाच्या पीठाचे धिरडे तयार होतील. पण काही वेळेला धिरडे तव्याला चिकटतात. व्यवस्थित तयार होत नाही. पण या रेसिपीला फॉलो केल्यास धिरडे परफेक्ट तयार होतील(Spicy Wheat Flour Dhirde Recipe; make in 15 minutes).

गव्हाच्या पीठाचे धिरडे करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचे पीठ

कांदा

'मिलेगा ना सचिवजी' म्हणणारी पंचायतमधली ‘आजी’, आयुष्यभर झगडली आणि वयाच्या ७५ व्या वर्षी आता..

पालक

जिरे पावडर

धणे पावडर

लाल तिखट

मीठ

हळद

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ कप गव्हाचं पीठ घ्या. नंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली पालक, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धणे पावडर, एक चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद घालून मिक्स करा. नंतर त्यात गरजेनुसार घालून मिक्स करा, आणि सरसरीत बॅटर तयार करा.

कपभर रव्याचे करा कुरकुरीत वडे; पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी पौष्टिक पदार्थ-शाळेच्या डब्यासाठीही उत्तम

दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. तव्याला ब्रशने तेल लावा. त्यात चमचाभर बॅटर ओतून पसरवा, व दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे गव्हाच्या पीठाचे चमचमीत धिरडे खाण्यासाठी रेडी. आपण हे धिरडे टिफिनसाठी किंवा नाश्त्यामध्येही खाऊ शकता. 

Web Title: Spicy Wheat Flour Dhirde Recipe; make in 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.