Join us  

पालकाची भाजी नेहमीचीच, करा पालकाची चटणी! तोंडी लावण्यासाठी चमचमीत पदार्थ, पालक आवडायला लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2024 1:51 PM

Spinach Chutney Recipe: the Perfect Side Dish for Idli Dosa : पालकाची चटणी बनवायला सोपी, पचायला हलकी; खिचडीसोबत लागते अप्रतिम

तोंडी लावण्यासाठी ताटात चटणी हवीच. चटणीमुळे जेवणाची रंगत वाढते (Chutney Recipe). महाराष्ट्रीयन पद्धतीचे अनेक प्रकारच्या चटण्या केल्या जातात. खोबरं, लसूण, तीळ, कोथिंबीरीची चटणी आपण खाल्लीच असेल (Food). पण कधी पालकाची चटणी खाऊन पाहिली आहे का? (Cooking Tips) पालकाची भाजी, भजी, पालक पत्ता, पालकची पातळ भाजी आपण खाल्लीच असेल.

पण जर आपल्याला जेवणात काहीतरी हटके हवं असले तर, कांदा पालक चटणी करून पाहा (Chutney Recipe). पालक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यात पौष्टीक घटकही आढळतात. पण रोजची पालकाची भाजी खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे झटपट एकदा चटपटीत पालकाची चटणी करून पाहा(Spinach Chutney Recipe: the Perfect Side Dish for Idli Dosa).

पालकाची चटपटीत चटणी कशी करायची?

पालक

तेल

रोजरोज चपात्या लाटण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीनं चपात्या केल्या तर ३ महिने टिकतात

चणा डाळ

जिरं

लाल सुक्या मिरच्या

धणे

२ कांदे

मीठ

चिंच

लसूण

कडीपत्ता

हळद

लाल तिखट

लागणारं साहित्य

पालकाची चटपटीत चटणी करण्यासाठी पालक आधी निवडून स्वच्छ धुवून घ्या. पालक निवडून झाल्यानंतर बारीक चिरून घ्या. गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा चणा डाळ, धणे, जिरं आणि २ ते ३ लाल सुक्या मिरच्या घालून मसाले भाजून घ्या.

विकेंडला कपभर पोह्याचे करा पौष्टीक अप्पे; हेल्दी रेसिपी १० मिनिटात गुबगुबीत अप्पे रेडी

मसाले भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर त्यात २ बारीक चिरलेले कांदे, चवीनुसार मीठ आणि चिंच घालून भाजून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले मसाले आणि भाजलेला कांदा घालून साहित्य वाटून घ्या. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.

एका कढईत २ चमचे तेल घाला. नंतर त्यात एक चमचा चणा डाळ, जिरं, मोहरी, ठेचलेला लसूण, कढीपत्ता आणि हळद घालून भाजून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेला पालक, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि तयार पेस्ट घालून साहित्य एकजीव करा. २ मिनिटासाठी वाफेवर शिजवून घ्या. अशा प्रकारे पालकाची चटपटीत चटणी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स