Join us  

कांदा भजी नेहमीचीच, कांद्याच्या पातीची भजी कधी खाल्ली आहे ? खा कुरकुरीत कांदापातीची भजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2024 2:07 PM

How To Make Spring Onion Pakoda At Home : Spring Onion Pakora Recipe : कांद्याच्या पातीची कुरकुरीत भजी खायला खूप चविष्ट, अप्रतिम लागते, ही भजी बनवायची सोपी रेसिपी पाहूयात...

पावसाळा आणि गरमागरम भजी यांचे अतूट नाते आहे. धो धो कोसळणारा मुसळधार पाऊस आणि गरमागरम भजी व चहा हे कॉम्बिनेशन म्हणजे खूपच भारी. भजी शिवाय पावसाळा हा अधूराच आहे. पावसाळ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खाणे पसंत करतो. कांदा - बटाट्याची भजी तर नेहमीचीच, पण मुगाच्या डाळीची भजी, पालक भजी, मक्याच्या दाण्यांची भजी असे भजीचे असंख्य प्रकार आपण खातो. आपल्या सगळ्यांच्याच घरात कांद्या सोबतच कांद्याची पात देखील अगदी आवडीने खाल्ली जाते. कांद्याच्या पातीचा वापर हा बहुतेकवेळा चायनीज पदार्थांमध्ये जास्त केला जातो. चिवडा, पोहे अशा अनेक पदार्थांवर ही कांद्याची पात भुरभुरवून घातली जाते(Spring Onion Pakoda Recipe).

कांद्याप्रमाणेच कांद्याची पात सुद्धा आरोग्यासाठी चांगली असते. कांद्याच्या पातीमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. याच कांद्याच्या पातीचा वापर करून आपण त्याची कुरकुरीत, खमंग भजी बनवू शकतो. कांद्याच्या पातीची कुरकुरीत भजी खायला खूप चविष्ट आणि अप्रतिम लागते. ही भजी बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. आता पावसाळ्यात कांद्याची पात (Spring onion pakoda recipe) मार्केटमध्ये सहज उपलब्ध असते. यामुळे गरमागरम भजी बनवण्याचा बेत तुम्ही आखू शकता. कांदा, बटाटा भजी खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही कांद्याच्या पातीची भजी बनवू शकता. ही भजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Spring Onion Pakoda At Home).

साहित्य :- 

१. कांद्याची पात - २ कप (बारीक चिरलेली)२. आलं - १ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेलं)३. लसूण -  १ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेला)४. टोमॅटो - १ कप (बारीक चिरलेला)५. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ (बारीक चिरलेल्या)६. हळद - १ टेबलस्पून ७. मीठ - चवीनुसार ८. तांदळाचा रवा - १/२ कप९. तांदुळाचे पीठ - १ कप१०. बेकिंग सोडा - १/४ टेबलस्पून ११. पाणी किंवा पिण्याचा सोडा - गरजेनुसार   १२. तेल - गरजेनुसार 

दुधी भोपळा आवडत नाही म्हणणारेही दुधीचे थालीपीठ करतील फस्त! मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी मस्त पौष्टिक पदार्थ...

कृती :- 

१. एका मोठ्या बाऊलमध्ये कांद्याची पात बारीक कापून घ्यावी मग त्यात बारीक किसून घेतलेलं आलं, लसूण, बारीक चिरलेला टोमॅटो घ्यावा. आता त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात. २. आता या भजीच्या बॅटरमध्ये चवीनुसार हळद, मीठ घालावे. त्यानंतर योग्य बाइंडिंग करण्यासाठी तांदुळाचा रवा व तांदुळाचे पीठ घालावे. सगळ्यात शेवटी यात चिमूटभर बेकिंग सोडा घालावा. 

धुतलेली भांडी ठेवण्याची स्टीलची जाळी अस्वच्छ दिसते? १ भन्नाट ट्रिक, जाळी दिसेल नव्यासारखी चकचकीत...

३. आता या तयार मिश्रणात गरजेनुसार पिण्याचा सोडा (पर्यायी) किंवा पाणी घालून मध्यम कन्सिस्टंन्सीचे बॅटर बनवून घ्यावे. ४. एका कढईत तेल ओतून ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. गरम तेलात या बॅटरच्या मध्यम आकाराच्या गोल भज्या सोडाव्यात. ५. गरम तेलात भज्या खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात. 

अशाप्रकारे कांद्याच्या पतीचा वापर करुन आपण मस्त खमंग, क्रिस्पी भज्या बनवू शकतो.

टॅग्स :अन्नपाककृती