Lokmat Sakhi >Food > कोण म्हणतं शिळं खाऊ नये; तज्ज्ञ सांगतात नाश्त्याला शिळी चपाती खाण्याचे ५ फायदे

कोण म्हणतं शिळं खाऊ नये; तज्ज्ञ सांगतात नाश्त्याला शिळी चपाती खाण्याचे ५ फायदे

Stale Roties Have Amazing Health Benefits : आहारातज्ज्ञ सांगतात की आपण ताज्या चपातीच्या तुलनेत शिळी चपाती खाल्ली तर पचनक्रिया चांगली राहते .

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 03:48 PM2024-02-23T15:48:58+5:302024-02-23T18:48:24+5:30

Stale Roties Have Amazing Health Benefits : आहारातज्ज्ञ सांगतात की आपण ताज्या चपातीच्या तुलनेत शिळी चपाती खाल्ली तर पचनक्रिया चांगली राहते .

Stale Roties Have Amazing Health Benefits That You May Be Not Be Aware Of | कोण म्हणतं शिळं खाऊ नये; तज्ज्ञ सांगतात नाश्त्याला शिळी चपाती खाण्याचे ५ फायदे

कोण म्हणतं शिळं खाऊ नये; तज्ज्ञ सांगतात नाश्त्याला शिळी चपाती खाण्याचे ५ फायदे

अनेकदा रात्री बनवलेली चपाती शिळी समजून फेकून दिली जाते आपल्याला वाटत की सकाळी रात्रीची शिळी चपाती खायला नको.  पण शिळी चपाती  खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. शिळी चपाती खाण्याचे बरेच फायदे आहेत. (Health Benefits And Uses Of Bassi Roti)शिळी चपाती खाल्ल्याने पोट भरतं याशिवाय आजारांपासूही दूर राहता येते. (Stale Roties Have Amazing Health Benefits) भारतीय जेवणाच्या थाळीत चपाती किवा रोटी हा मुख्य घटक आहे. चपातीशिवाय जेवणच अपूर्ण आहे. ताजी चपाती रोजच्या जेवणाला सगळेचजण खातात. पण शिळी चपाती खाल्ल्यानेही शरीराला बरेच फायदे मिळतात. (Shili Chapati Khanyache Fayde) 

आहारतज्ज्ञ गगन सिधू यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून  शिळी चपाती खाण्याचे फायदे सांगितले आहेत. आहारातज्ज्ञ सांगतात की आपण ताज्या चपातीच्या तुलनेत शिळी चपाती खाल्ली तर पचनक्रिया चांगली राहते . ताज्या चपातीत मॉईश्चर कमी असल्यामुळे ही चपाती पचायलला हलकी  नसते. म्हणून कधीतरी शिळ्या चपातीचे सेवन करू शकता. (Health Benefits And Uses Of Bassi Roti)

शिळी चपाती खाण्याचे फायदे

1) शिळी चपाती १२ तास चांगली राहते. यात कॅलरीज आणि फॅट्स कमी  प्रमाणात असतात. यात फायबर्स, प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. शिळी चपाती खाल्ल्याने लवकर भूकही लागत नाही.  यामुळे तुम्ही जंक फूड किंवा  स्नॅकिंग करत नाही. वजन  वाढत नाही.

थकवा येतो-अंगदुखी जाणवते? मॅग्नेशियमने खच्चून भरलेत ७ पदार्थ, रोज खा-निरोगी राहाल रक्त वाढेल

2) शिळी चपाती खाल्ल्याने फक्त पोटाच्या  समसया कमी होत नाहीत तर ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये येते.  थंड दुधात चपाती भिजवून खाल्ल्याने शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. ब्लड प्रेशरही वाढत नाही. ज्यामुळे इंसुलिनची आवश्यकता  भासत नाही.

3) आतड्यांमध्ये हेल्दी बॅक्टेरियांची संख्या कमी व्हायला नको. कारण डायजेशनसाठी फार महत्वाचे असते.  शिळी चपाती खाल्ल्याने बॅक्टेरियाजची संख्या कमी  होईल.  गॅस,कब्ज आणि खराब पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो.

कोण सांगतं व्हेज जेवणात प्रोटीन नसतं? ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना दुप्पट प्रोटीन मिळेल-फिट राहाल

4) ब्रेकफास्ट  किंवा ऑफिसला जाताना तुम्ही हा नाश्ता करू शकता. शिळ्या चपातीत डाएटरी फायबर्स असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत  होते. दीर्घकाळ पोट भरल्यासारखं  राहतं. 

5) शिळ्या चपातीतले गुड बॅक्टेरियाज आजारांपासून बचाव करण्यास फायदेशीर ठरतात.

Web Title: Stale Roties Have Amazing Health Benefits That You May Be Not Be Aware Of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.