चपाती आणि भात हे रोजच्या आहारातील भाग आहेत. गव्हाची चपाती असो किंवा मल्टीग्रेट चपती. याशिवाय भारतीय थाळी अपूर्ण वाटते. बरेचजण ताजी फुगलेली चपाती खाणं पसतं करतात. पण अनेकदा चपात्या शिल्लक राहतात. शिळे अन्न म्हणून काहीजण चपात्या फेकून देतात तर काहीजण चपाती आवडीने खातात. शिळी चपाती खाल्ल्याने शरीराचं नुकसान होऊ शकत असं अनेकांचे म्हणणे आहे. (Benefits Of Eating Leftover Chapati Stale Chapati Benefits) शिळी चपाती खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. याबाबत डायटिशियन नंदिनी यांनी अधिक माहिती दिली आहे. (Stale Vs Fresh Roti Which Is Better For Health)
एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार ताज्या चपातीच्या तुलनेत शिळी चपाती खाणं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. शिळ्या चपाती गुड बॅक्टेरियाज असतात. ज्यामुळे गट हेल्थ चांगली राहते. शिळ्या चपात्यांमुळे बॅक्टेरियाज वाढतात आणि डायजेशन सुधारण्यास मदत होते. शिळं अन्न पचनक्रियेसाठी खराब मानलं जातं. पण शिळी चपाती डायजेस्टिव्ह सिस्टिमसाठी चांगली असते. फक्त शिळी चपाती खाताना ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की चपाती अति प्रमाणात शिळी असू नये.
पंखा धुळीने माखलाय? फक्त १ रूपयांत चमकेल पंखा; हात न लावता पंखा साफ करण्याची सोपी ट्रिक
तुम्ही सकाळीची चपाती रात्री किंवा रात्रीची चपाती सकाळी खा. चपाती जास्त शिळी असू नये. १ दिवस शिळी चपाती खाल्ली तर यामुळे तब्येतीला नुकसान होणार नाही. एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार १० ते १२ तास आधी तयार केलेली चपाती खाणं फायदेशीर ठरतं.
चपातीत रेजिस्टेंस स्टार्च वाढतात जे तब्येतीसाठी फायदेशीर ठरतात. डायबिटीसमध्ये रेजिस्टंट स्टार्च फायदेशीर ठरते. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल स्पाईक होत नाही. शिळ्या चपातीत व्हिटामीन बी१२ चे प्रमाण जास्त असते. ज्या लोकांमध्ये व्हिटामीन बी-१२ कमी असते त्यांनी शिळ्या चपाती खायला हव्यात.
केस गळणं वाढलंय? रामदेव बाबा सांगतात केस वाढवण्याचा खास उपाय, केस होतील दाट
एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार शिळी चपाती वजन कमी करण्यास मदत होते. शिळी चपाती दही किंवा तूपाबरोबर खाऊ शकता. किंवा चपातीचा कुस्करा बनवू शकता. निरोगी राहण्यासााठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. तुम्ही शिळ्या चपातीचे सेवन सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला करू शकता.