Join us

दह्यासोबत 'या' ३ गोष्टी खाणं करा सुरू, शरीराला मिळतील एकापेक्षा एक जबरदस्त फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 12:17 IST

How to eat Curd : दह्याचे आणखी जास्त फायदे मिळवायचे असतील तर यात मध, साखर किंवा आवळा मिक्स करून खावं. यानं काय फायदे होतात ते जाणून घेऊ.

How to eat Curd : दही खाणं भरपूर लोकांना आवडतं. दह्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. दही खायला तर टेस्टी लागतच, सोबतच यातून भरपूर पोषक तत्वही शरीराला मिळतात. आरोग्यासंबंधी अनेक समस्या दह्यामुळे दूर होतात. नियमितपणे दही खाल्ल्यास इम्यूनिटी मजबूत होते, त्वचा चांगली राहते आणि तणाव कमी होतो. दह्याचे आणखी जास्त फायदे मिळवायचे असतील तर यात मध, साखर किंवा आवळा मिक्स करून खावं. यानं काय फायदे होतात ते जाणून घेऊ.

दही आणि आवळा

दही आणि आवळा दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. अशात या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्यास पचन शक्ती आणखी मजबूत होते. इम्यूनिटी मजबूत होते. सोबतच आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. यासाटी १ वाटी दह्यात एक चमचा आवळा पावडर मिक्स करू खाऊ शकता. हे मिश्रण हेअर मास्कसारखं केसांवरही लावू शकता. यानं केसांची वाढ चांगली होईल आणि केस चमकदार होतील.

दही आणि मध

दही आणि मध एकत्र खाणंही खूप फायदेशीर ठरतं. या मिश्रणानं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी बर्न होते. तसेच थकवा आणि कमजोरी दूर होते. सोबतच हाडंही मजबूत होतात. अशात एक वाटी दह्यात एक चमचा मध मिक्स करा.

दही आणि साखर

तुम्ही दह्यात साखर मिक्स करूनही खाऊ शकता. यानं पोटाला थंडावा मिळतो आणि डिहायड्रेशनचा धोकाही कमी राहतो. दह्यात साखर टाकून खाल्ल्यास पोटातील जळजळ कमी होते. तसेच हाडंही मजबूत होतात.

दही खाताना टाळायच्या गोष्टी

- ज्या लोकांना कफ आणि कंजक्शनची समस्या आहे त्यांनी चुकूनही दह्याचं सेवन करू नये. उन्हाळ्यात दह्यामुळे कफाची समस्या आणखी वाढू शकते.

- जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर फार जास्त दही खाणं टाळलं पाहिजे. दही हे फॅट असलेल्या दुधापासून बनवलं जातं. त्यामुळे जर जास्त दही खाल्लं तर वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं. तसेच याने हाडांची डेसिंटी कमी होते.

- जर तुमचं पचन तंत्र कमजोर असेल तर दही खाणं टाळलं पाहिजे. कारण पचवण्याला वेळ लागतो. अशात ज्या लोकांचं डायजेस्टीव सिस्टीम कमजोर आहे त्यांनी आठवड्यातून केवळ 2 ते 3 दिवसच दही खावं.

- दही नेहमीच दिवसा खावं. रात्री दही खाणं नुकसानकारक ठरू शकतं. आयुर्वेदानुसार दह्यामुळे म्यूकस वाढतो. यामुळे तुम्हाला श्वासासंबंधी समस्या होऊ शकतात.

- दही खाताना या गोष्टीची काळजी घ्या की, दही ताजं खावं. दही जास्त दिवसाचं असेल तर ते आंबट लागतं. यामुळे गॅसची समस्या वाढते. घरी बनवलेलं दही खाणं कधीही चांगलं.

- दह्यात साखर टाकून खाल्ल्याने तहान भागते. पण डायबिटीसच्या रूग्णांसाठी दह्यात साखर टाकून खाणं नुकसानकारक ठरू शकतं. असात डायबिटीसचे रूग्ण दह्यात साखर टाकण्याऐवजी छासचं सेवन करू शकता.

- दही कधीही गरम करून खाऊ नये. दही गरम केल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स