Join us  

श्रावण स्पेशल : श्रावणात पुरणाचे पदार्थ तर करायचे पण पुरणच बिघडतं? परफेक्ट पुरण करण्यासाठी खास रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 4:35 PM

How To Make Perfect Puran At Home : Recipe for Puran : पुराणाचे पदार्थ तयार करताना पुरण बिघडू नये म्हणून फॉलो करा खास पारंपरिक रेसिपी...

श्रावण महिना आला की येतात सणवार. सणवार म्हटलं की पुरणाचा स्वयंपाक लागतोच. प्रत्येक सणानुसार आपल्याकडे वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. गोडाधोडाचे पदार्थ म्हटलं की पुरण हे लागतच. श्रावण महिन्यात सणावाराला पुरणाची पोळी अनेकदा केली जाते. पुरणाची पोळी करायची म्हणजे खूप मोठा घाट घालावा लागतो. पुरण परफेक्ट झाले तरच त्या पुरणाच्या पोळ्या खाव्याशा वाटतात. याउलट पुरण जर व्यवस्थित झाले नाही तर पदार्थ बिघडतो. यासाठी पुरणाचे अनेक पदार्थ करताना पुरण परफेक्ट असणे गरजेचे असते(How To Make Perfect Puran At Home).

कित्येकजणींना पुरण करायचे म्हटलं की फार टेंन्शन येते. काहीवेळा हे पुरण (Recipe for Puran) छान गोड, रवाळ तयार होते. परंतु काहीवेळा हे पुरण फसते, असे पुरण (Sweet Puran) चिकट किंवा पातळ होते जर पुरणच व्यवस्थित झाले नाही तर पुरणपोळी चांगली होत नाही. अशावेळी पुरण परफेक्ट तयार होणे तितकेच महत्वाचे असते. योग्य सहित्य, अचूक प्रमाण आणि काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर आपले पुरण अगदी परफेक्ट तयार होते. असेच परफेक्ट पुरण तयार करण्यासाठी त्याचे योग्य प्रमाण आणि ते तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(Recipe for Authentic Puran).               

साहित्य :- 

१. हरभरा डाळ - ३ कप २. पाणी - ६ कप ३. गूळ - ३ कप (किसलेला गूळ) ४. साखर - अर्धा कप ५. जायफळ - चवीनुसार ६. वेलची पावडर - चवीनुसार ७. केसर - चवीनुसार८. तेल - गरजेनुसार ९. हळद - चिमुटभर  

काहीतरी गोड खावेसे वाटते,  सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगते, १ सोपी रेसिपी - गोड आणि पौष्टीक...

रात्री उरलेल्या शिळ्या पुऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळीही राहतील ताज्या - मऊ,  ४ सोप्या टिप्स...

कृती :- 

१. हरभऱ्याची डाळ पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावी. डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही डाळ अर्धा तास तशीच ठेवून द्यावी. २. अर्ध्या तासानंतर या डाळीत पाणी घालावे. पाणी घालून ही डाळ शिजण्यासाठी ठेवून द्यावी. डाळीत पाणी घातल्यानंतर गरजेनुसार तेल व हळद घालून ही डाळ शिजण्यासाठी ठेवून द्यावी. ३. आता शिजवून घेतलेली डाळ एका गाळणीत काढून त्यातील जास्तीचे पाणी काढून घ्यावे. जास्तीचे पाणी वेगळे काढून ही शिजलेली डाळ एका भांड्यात काढून घ्यावी. 

४. डाळ एका भांड्यात घेऊन त्यात किसलेला गूळ, साखर, जायफळ, वेलची पावडर, केसर घालून हे पुरण एकजीव करून शिजायला ठेवावे. ५. पुरण व्यवस्थित शिजवून घ्यावे. उलाथनं या पुरणामध्ये उभे राहील तेव्हा पुरण व्यवस्थित शिजले असे म्हणावे. ६. हे गरम पुरण,  पुरण यंत्रात घालून बारीक होईपर्यंत वाटून घ्यावे.  

परफेक्ट पुरण तयार आहे. या पुरणाचा वापर करुन आपण वेगवेगळे पदार्थ तयार करु शकता. अशाप्रकारे आपण योग्य प्रमाण घेऊन पुरण केल्यास आपले पुरण न बिघडता अगदी परफेक्ट होईल.

टॅग्स :अन्नपाककृतीश्रावण स्पेशल