महाराष्ट्रात असे अनेक पदार्थ आहेत, जे महाराष्ट्रातच नाही तर, जगभरात प्रसिद्ध आहेत. पुरणपोळी, कटाची आमटी, मसाले भात, मोदक इत्यादी पदार्थ सणासुदीला आवर्जून तयार केले जातात. महाराष्ट्रीयन पदार्थांच्या यादीत अळूवडीचा देखील समावेश आहे. पावसाळा सुरु झाला की, भाजी मंडईतील विक्र्त्यांकडे अळूची पानं हमखास मिळतात.
अळूची पानं आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम मोठ्या प्रमाणावर असते. अळूच्या पानांपासून आपण अळूचं फदफदं किंवा कुरकुरीत अळूवडी तयार करू शकतो. अळूवडी करण्याची प्रोसेस खूप मोठी आहे. बेसनाचं बॅटर तयार करण्यापासून ते वडी वाफवून - तळण्यापर्यंत खूप वेळ लागतो. पण आपण अळूवडी न वाफवता देखील तयार करू शकतो. ते कसे पाहूयात(Step By Step Recipe On How To Make Alu Vadi).
न वाफवता अळूवडी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
अळूची पानं
गुळ
चिंच
बेसन
तांदुळाचं पीठ
आलं - लसूण - हिरव्या मिरचीची पेस्ट
लसणाची पेस्ट
ओवा
शेंगदाण्याचं कूट
न आंबवता - ५ डाळींचा करा प्रोटीन डोसा, ग्लुटेन फ्री डोसा - वजन कमी करण्यासाठी बेस्ट नाश्ता
धणे पूड
हळद
लाल तिखट
गरम मसाला
बडीशेप
हिंग
बेकिंग सोडा
तेल
कृती
सर्वप्रथम, एका वाटीत कोमट पाणी घ्या, त्यात एक गुळाचा खडा आणि चिंच घालून ठेवा. १० मिनिटानंतर गुळ आणि चिंच पाण्यात विरघळेल. बॅटरमध्ये गुळ - चिंचेचा कोळ घातल्याने वडीला छान आंबट - गोड चव येते. दुसरीकडे एका बाऊलमध्ये एक कप बेसन, एक कप तांदुळाचं पीठ, २ टेबलस्पून आलं - लसूण - हिरव्या मिरचीची पेस्ट, एक टेबलस्पून लसणाची पेस्ट, एक टेबलस्पून ओवा, २ टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट, एक चमचा धणे पूड, चिमुटभर हळद, दीड चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, एक टेबलस्पून बडीशेप, चिमुटभर हिंग, व अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा.
न लाटता १० मिनिटांत करा आलू पराठे, १ सोपी ट्रिक - गरम पराठा झटपट तयार
आता त्यात तयार गुळ आणि चिंचेचं कोळ घालून मिक्स करा. फोडणीच्या पळीत २ टेबलस्पून तेल घालून गरम करा. व हे गरम तेल बॅटरमध्ये घालून मिक्स करा. बॅटर जास्त पातळ किंवा घट्ट नसून सरसरीत तयार करा. आपण त्यात गरजेनुसार पाणी देखील मिक्स करू शकता.
आता अळूची पानं धुवून घ्या. चाकूने त्याची देठ काढा. उलट्या पानांवर हाताने बेसनाचे बॅटर एकसारखे लावा. त्यावर दोन ते तीन पानं ठेऊन त्यावरही बॅटर लावा. व पानांना वळवून रॉल करून पॅक करा. रोल केल्यानंतर धारदार सुरीने वडी कापून घ्या. आता एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर, वडीला मधोमध दुमडून तेलात तळण्यासाठी सोडा. व दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे न वाफवता क्रिस्पी अळूवडी खाण्यासाठी रेडी.