Lokmat Sakhi >Food > १ कप ज्वारीच्या पिठाच्या करा खुसखुशीत वड्या, नाश्ता असा भारी की तोंडाला येईल चव

१ कप ज्वारीच्या पिठाच्या करा खुसखुशीत वड्या, नाश्ता असा भारी की तोंडाला येईल चव

Steps to Prepare Favorite Jowar vadi ज्वारीच्या पिठाची भाकरी खाऊन पाहिली, आता वडी ट्राय करून पाहा. पावसाळ्यात करायलाच हवा खमंग बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 02:37 PM2023-07-26T14:37:07+5:302023-07-26T14:38:06+5:30

Steps to Prepare Favorite Jowar vadi ज्वारीच्या पिठाची भाकरी खाऊन पाहिली, आता वडी ट्राय करून पाहा. पावसाळ्यात करायलाच हवा खमंग बेत

Steps to Prepare Favorite Jowar vadi | १ कप ज्वारीच्या पिठाच्या करा खुसखुशीत वड्या, नाश्ता असा भारी की तोंडाला येईल चव

१ कप ज्वारीच्या पिठाच्या करा खुसखुशीत वड्या, नाश्ता असा भारी की तोंडाला येईल चव

आपल्या महाराष्ट्रात अनेक पदार्थ जगभरात फेमस आहे. महाराष्ट्रीयन थाळीमध्ये तोंडी लावण्यासाठी विशिष्ट पदार्थ केले जातात. ज्यात लोणची, पापड, कुरडई, भजी आणि वड्यांचा देखील समावेश आहे. वड्यांमध्ये अनेक प्रकार केले जातात. कोथिंबीर वडी, कोबी वडी, पालक वडी, मेथी वडी, या वड्या चवीने खाल्ले जातात. वडी करताना बहुतांश वेळी बेसनाचा वापर होतो. परंतु, जर घरात बेसनच उपलब्ध नसेल तर? जर आपल्याला बेसन पचत नसेल किंवा, बेसनाच्या वड्या खाऊन कंटाळा आला असेल तर, ज्वारीच्या पिठाची वडी ही रेसिपी ट्राय करून पाहा.

ज्वारीच्या पिठामध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात. ज्वारीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्नचं प्रमाण अधिक असल्याने त्याचा फायदा आरोग्याला होतो. त्यामुळे ज्वारीच्या पिठाची वडी ही खमंग रेसिपी एकदा ट्राय करून बघायलाच हवी(Steps to Prepare Favorite Jowar vadi).

ज्वारीच्या पिठाची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य

ज्वारीचे पीठ

रवा

मीठ

पालक

कोथिंबीर

वाफाळत्या गरमागरग खांदेशी चवीच्या ज्वारीच्या कण्या खाणं म्हणजे सुख! बालपणाच्या आठवणींत रंगलेली पारंपरिक रेसिपी

कांदा

हिरवी मिरची

आलं - लसूण पेस्ट

दही

धणे - जिरं पावडर

आमचूर पावडर

लाल तिखट

हळद

साखर

तेल

पाणी

बेकिंग सोडा

मोहरी

जिरं

पांढरे तीळ

हिंग

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप ज्वारीचे पीठ घ्या, त्यात अर्धा कप रवा, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली पालक, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, २ टीस्पून आलं - लसूण पेस्ट, एक कप दही, एक चमचा धणे - जिरं पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, चवीनुसार साखर, एक चमचा तेल व गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळताना त्यात चिमुटभर बेकिंग सोडा घालावा. व पुन्हा पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या.

दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. हाताला तेल लावून मळलेल्या पीठाचे लांबट आकाराचे गोळे तयार करा. स्टीमर प्लेटला तेल लावून ग्रीस करा, व त्यावर ज्वारीच्या पीठाचे गोळे ठेवा, व त्यावर झाकण लावून १५ ते २० मिनिटांसाठी मध्यम आचेवर शिजवून घ्या. १५ मिनिटानंतर वडी शिजली आहे की नाही हे चेक करा, व थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवा. वडी थंड झाल्यानंतर त्याचे चौकोनी काप करा.

१ वाटी पोह्यांची करा कुरकुरीत खमंग भजी! पाऊस - पोहे भजी आणि चहा, व्हा फ्रेश

गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा, त्यात २ चमचे तेल घाला, तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, २ चमचे पांढरे तीळ, चिमुटभर हिंग घालून भाजून घ्या, आता त्यात ज्वारीच्या पिठाची वडी घालून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. 

Web Title: Steps to Prepare Favorite Jowar vadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.