उन्हाच्या झळा बसायला लागल्यानंतर आपले पाय आपोआप ज्यूस सेंटर किंवा फ्रुट स्टॉलकडे वळतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण सतत पाणी यासह पाणीदार फळे खात राहतो. या दिवसात लोकं कलिंगड (Watermelon) अधिक प्रमाणात खातात. कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत. शिवाय यात ९० टक्क्यांपर्यंत पाणी असते. कलिंगड खाणं हे जवळपास प्रत्येकालाच आवडते. परंतु ते योग्यरित्या कापण्यात बराच वेळ जातो. शिवाय त्यातील बियांमुळे खाताना अडचण निर्माण होते. मुख्य म्हणजे कलिंगड जर चवीला गोड नसेल तर, कलिंगड खाण्याची इच्छाच कमी होते.
काही लोकं सुरी घेतात अन् कलिंगडाचे आडवे-तिडवे काप करून मोकळे होतात. पण असे न कापता कलिंगड चिरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. यामुळे कलिंगड खाताना बिया लागणार नाही. शिवाय कलिंगड खाण्याचा आनंद द्विगुणीत होईल(Stop Cutting Watermelon Wrong! Here's the Right Way).
गुळासोबत खा एक लसणाची पाकळी, बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी - रक्तही होईल पातळ
कलिंगड कापण्याची योग्य पद्धत
सर्वप्रथम, बाजारातून कलिंगड आणल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी एका भांड्यात पाणी घ्या, व त्यात ठेवा. यामुळे कलिंगड थंड होईल. आपण या पाण्यात बर्फाचे तुकडे देखील घालू शकता. निदान अर्धा तास तरी, या पाण्यात कलिंगड ठेवा. नंतर कापडाने कलिंगड पुसा.
माधुरी दीक्षितचं पाहा सिक्रेट, सुंदर केसांसाठी सोपा उपाय- एक केळं आणि..
पुसल्यानंतर सुरी घ्या. कलिंगडाची देठाची बाजू कट करून घ्या. नंतर कलिंगडाच्या मध्यभागी सुरी घालून मधून चीर पाडा, आणि कलिंगडाचे समान दोन भाग करा. नंतर बाहेरील हिरवा भाग सुरीने काढून घ्या. ज्याप्रमाणे आपण पीलरने बटाट्याची साल काढून घेतो. त्याचप्रमाणे कलिंगडाचा वरचा भाग सुरीने कापून घ्या.
आता कलिंगडाची खालची बाजू प्लेटवर ठेवा, आणि सुरीने पातळ स्लाईज कापून घ्या. आपण पाहू शकता स्लाईजच्या मध्यभागी बिया असतील, कलिंगडाची स्लाईज मध्यभागी कापा आणि त्यातून बिया काढा. काही मिनिटात त्या बिया सहज निघतील. अशा पद्धतीने कलिंगड कापल्यास बिया निघतील, शिवाय कमी वेळात कलिंगड कापला जाईल.