ऑफिसवरून घरी जायला जरा उशीर झाला. नाष्ट्याला काय बनवायचं सुचलं नाही.(Stop Eating Bread ) भूक लागली आहे, पटकन काही तरी पोटभरीचं खायचं आहे. अशा प्रसंगी काय सुचत? अगदी बरोबर.. पटकन डोक्यात ब्रेडचाच विचार येतो. आपल्या घरी ब्रेड आणून आपण ठेवून देतो. जेणेकरून नाष्ट्यासाठी किंवा डब्याला नेण्यासाठी वापरता येईल. आपल्या मुलांना पोळी आवडत नाही.(Stop Eating Bread ) म्हणून ब्रेड-बटर, ब्रेड-जॅम आपण त्यांना खायला देतो. पण ब्रेड खाणे शरीरासाठी चांगले आहे का नाही, याचा कधी विचार केला आहे का?(Stop Eating Bread )
सँन्डविचला आपण हेल्दी पदार्थ म्हणतो खर, पण ब्रेडचा पदार्थ पौष्टिक असू शकतो हे मानायला तज्ज्ञ तयार होत नाहीत. बॉलिवूड डायटिशयन सुमन अगरवाल सांगते की, ब्रेड खाऊ नका. तो चांगला नाही. ब्रेडमध्ये यीस्ट भरपूर असतं. मैदा पोटात फुगतो. ब्रेड चविष्ट बनवण्यासाठी त्याच गोड रसायने घालतात.मऊ बनवण्यासाठी आणि फुगवण्यासाठी फॅट्स अॅड करतात.त्यात जे प्रिझरव्हेटिवज असतात शरीरासाठी ते चांगले नाही. ब्राऊन असो किंवा पांढरा असो तो हेल्दी नाही. पोळी खाणे कायम उत्तम. पंजाबी लोकांमध्ये ब्रेड वगैरे खाण्याचे फॅड नाही. ते मजबूत असतात. पंजाबी लोक रोटी खातात. आपण पण तसंच करायला हवं. असं सुमन अगरवाल सांगतात.
ब्रेडच्या ऐवाजी पोळी खायला आवडत नसेल तर सावरडो खा. त्यात शरीराला हानिकारक ठरेल असे काही नाही. चवीलादेखील फार छान असतो. जर तुम्हाला आवडणाऱ्या पदार्थाच्या तोडीचा हेल्दी पर्याय आहे तर तोच पदार्थ वापरा. पण ब्रेड खाणं टाळा. तो चांगला नाही. ब्रेडला हेल्दी म्हणणाऱ्यांचे ऐकू नका. लहान मुलांच्या हट्टासाठी त्यांना असे पदार्थ खायला देऊ नयेत. घरी बनवलेले ताजे पदार्थच मुलांना द्यावे. वजन कमी करण्याच्या डाईट मध्ये आपण ब्रेड खातो. पण ब्रेड पोटात बसतो. वजन कमी नाही तर वाढवण्याचे काम ब्रेड करतो.