लहानपणापासून आपल्याला दूध पिण्याची सवय लावण्यात आली आहे. दूध प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. दुधाचे अनेक प्रकार केले जातात, दुधापासून दही, पनीर, श्रीखंड, आणि तूप तयार होते. तूप करण्याची प्रोसेस फार मोठी आहे. घरगुती तूप तयार करण्यासाठी, साधारण १० दिवस आधी त्याची साय साठवून ठेवण्यात येते. त्यानंतर लोणी कडवून त्यातून साजूक रवाळ तूप तयार होते.
अनकेदा साय साठवून ठेवल्यानंतर त्यातून दुर्गंधी येऊ लागते. काही वेळेला सायीवर फंगस देखील तयार होते. त्यामुळे साठवून ठेवलेली सायी खराब होऊन जाते. त्यापासून तूप तयार होत नाही. तूप करण्यासाठी साय कशा पद्धतीने साठवून ठेवायची? साय साठवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्या हे पाहूयात(Store Malai Like This To Keep It Fresh For Long).
दुधाची साय स्टोर करून ठेवण्यासाठी फॉलो करा ४ टिप्स
स्टीलच्या डब्यात साठवा
दुधाची साय साठवण्यासाठी आपण डब्याचा वापर करतो, किंवा एखाद्या भांड्याचा वापर करतो. जर आपल्याला तूप करण्यासाठी साय साठवून ठेवायची असेल तर, स्टीलच्या भांड्याचा किंवा डब्याचा वापर करा. स्टीलच्या भांड्यामध्ये साय दीर्घकाळ फ्रेश राहते. प्लास्टिकच्या डब्यात साठवून ठेवल्यास त्यातून हमखास दुर्गंधी येणार.
तूप ग्रीस करा
दुधाची साय साठवण्यासाठी तुपाचा वापर करा. आपण साधारण दुधाची साय एका डब्यात साठवून ठेवतो. दुधाची साय साठवण्यापूर्वी डब्याच्या आतील बाजूस तूप लावून ग्रीस करा. या ट्रिकमुळे दुधाची साय अधिक दिवस टिकून राहील.
डीप फ्रिजचा वापर
जर आपल्याला दुधाची साय अधिक काळ टिकून राहावे असे वाटत असेल तर, डीप फ्रिजचा वापर करा. दुधाची साय डीप फ्रिजमध्ये ठेवणे उत्तम ठरू शकते. थंड वातावरणामुळे दुधाच्या सायीमध्ये बॅक्टेरिया वाढणार नाही. व ते लवकर खराब होणार नाही.
नाश्त्याला करा गुजराथी हांडवो, १ कपभर रव्याचा इन्स्टंट हांडवो! नेहमीच्या पोहे-उपम्यापेक्षा वेगळी चव
झाकून ठेवा
जेव्हा पण दुधाची साय साठवून ठेवत असाल तेव्हा, डब्याला किंवा भांड्याला झाकण असेल, याची खात्री करा. झाकलेल्या भांड्यात साय दीर्घकाळ टिकून राहते.