पावसाळ्यात गाडीवरचे गरमागरम वडापाव पाहिले तर खाण्याचा मोह आवरला जात नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांनाच वडापाव खूप आवडतो. कमीत कमी खर्चात भूक भागवण्यासाठी वडापाव ओळखला जातो. (Aloo vada recipe) काहीजणांना चहाबरोबर वडापाव खायला खूप आवडतो. पावसाळ्यात बटाटेवडे खाण्याची इच्छा होत नाही असा एकहीजण सापडणार नाही. पण बाहेरचे पदार्थ कोणत्या तेलात तळले जातात. (How to make batata vada) तेल कितीवेळा तळण्यासाठी वापरलं जातं याबाबत आपल्याला कल्पना नसते.
अशावेळी खोकल्याचा त्रास होतो तर अनेकांना बाहेरचं खाल्ल्यानं फूड पॉइजनिंग होतं. बाजारातल्या गाडीवर मिळतात तसे कुरकुरीत, खमंग बटाटेवडे घरीच बनवले तर घरातील सगळेजण पोटभर खातील आणि कसलाही त्रास होणार नाही. घरी बटाटेवडे बनवताना ते कुरकुरीत होत नाही, वडे खूप तेल पितात. (Batata Vada Recipe)
पीठ बटाट्याच्या गोळ्याला व्यवस्थित लागत नाही अशी अनेकांची तक्रार असते. परफेक्ट बटाटे वडे बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. २० ते ३० मिनिटांत गरमागरम बटाटेवडे बनून तयार होतील. सगळ्यात आधी बटाटे उकळून त्यात मसाले घालून मिश्रण तयार केलं जातं आणि त्यावर बेसन लावून फ्राय केले जातात आणि वडे चटणीसोबत खाल्ले जातात. (Street Style Vada Pav Recipe)
साहित्य
५ ते ६ बटाटे
५ ग्राम मोहोरी
५ ग्राम हळद
३ ग्राम मिरची पावडर
१० ग्राम आलं
१० ग्राम लसूण
२०० ग्राम बेसन
५ ग्राम लाल मिरची पावडर
५ ग्राम धणे पावडर
३ ग्राम हळद
चवीनुसार मीठ
कृती
१) बटाटे वडे बनण्यासााठी सगळ्यात आधी बटाटा उकडून सालं काढून घ्या त्यानंतर बटाटे कुस्करून घ्या त्यात हिरवी मिरची, आलं, हळद लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
२) हे मिश्रण मळून साईडला ठेवून द्या. नंतर कोटींगचं मिश्रण बनवण्यासाठी बेसन पीठात लाल तिखट, हळद, धणे पावडर, मीठ, पाणी मिसळून पेस्ट तयार करा.
३) हे मिश्रण जास्त पातळ नसेल याची खात्री करा. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहोरी, कढीपत्त्याची फोडणी देऊन त्यात बारीक केलेले बटाटे घाला. याचे लहान लहान बॉल्स करून बेसनात मिसळा. त्यानंतर गोल्डन होईपर्यंत डिप फ्राय करून वडे हिरव्या चटणीबरोबर खा.