Lokmat Sakhi >Food > चहाच्या कपवरील चिकट डाग काही मिनिटांत होतील साफ; 'ही' पद्धत ठरेल फायदेशीर

चहाच्या कपवरील चिकट डाग काही मिनिटांत होतील साफ; 'ही' पद्धत ठरेल फायदेशीर

चहाच्या कपवरील चिकट डाग हे स्वच्छ करणं अवघड होऊन जातं. पण ट्रिकने काही मिनिटांत चहाचा कप अगदी नव्यासारखा चमकवता येईल. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 17:26 IST2025-02-14T17:25:53+5:302025-02-14T17:26:45+5:30

चहाच्या कपवरील चिकट डाग हे स्वच्छ करणं अवघड होऊन जातं. पण ट्रिकने काही मिनिटांत चहाचा कप अगदी नव्यासारखा चमकवता येईल. 

stubborn stain on tea cup will be cleaned in minutes with this one thing it will shine like mirror | चहाच्या कपवरील चिकट डाग काही मिनिटांत होतील साफ; 'ही' पद्धत ठरेल फायदेशीर

चहाच्या कपवरील चिकट डाग काही मिनिटांत होतील साफ; 'ही' पद्धत ठरेल फायदेशीर

गरमागरम चहासह अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. काहींना तर दिवसातून अनेक कप चहा लागतोच तर काही जण एक कप चहा मिळाला तरी खूप खूश होतात. घरी पाहुणे आल्यावरही त्यांच्यासाठी स्पेशल चहा बनवला जातो. अनेकदा चहाच्या कपवरील चिकट डाग हे स्वच्छ करणं अवघड होऊन जातं. पण ट्रिकने काही मिनिटांत चहाचा कप अगदी नव्यासारखा चमकवता येईल. 

चहाचा कप असा करा स्वच्छ

मीठामध्ये लिंबाचा रस मिसळून कपला जिथे जास्त डाग आहेत त्या भागावर लावा. नंतर काही मिनिटांनी धुवा. यामुळे कपवरील डाग निघून जातील. याशिवाय, एक लिंबू अर्धा कापून त्यावर थोडे मीठ शिंपडा आणि कपवरील डागावर घासून घ्या. या पद्धतीने कपवरील डाग काही मिनिटांतच साफ होतील.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण बनवा. हे मिश्रण कपवर लावा आणि १०-१५ मिनिटं तसंच राहू द्या. यानंतर कप गरम पाण्याने धुवा. याच्या मदतीने कपवरील डाग एकाच वेळी साफ करता येतात. त्याच वेळी तुम्ही ते स्वच्छ करण्यासाठी कापड वापरू शकता.

डिशवॉश आणि बेकिंग सोडा

तुम्ही कपवर डिशवॉश आणि बेकिंग सोडा यांचं मिश्रण लावू शकता. यामुळे डाग सहज निघून जाईल. कॉर्न स्टार्चमध्ये व्हाईट व्हिनेगर मिसळून पेस्ट बनवा आणि डागावर लावा. आता ते हलक्या हाताने घासून धुवा, यामुळे कप पूर्वीसारखा स्वच्छ आणि चमकदार होईल.

चहा पावडर 

चहा बनवल्यानंतर चहा पावडर  कपवर घासून घ्या. यामुळे तुमच्या कपला लागलेला डाग साफ होऊ शकतो. त्यामध्ये असलेले नैसर्गिक घटक डाग काढून टाकण्यास मदत करतात. त्याच वेळी डागावर टूथपेस्ट लावा, ब्रशने घासून धुवा. 

या पद्धती वापरून तुम्ही चहाच्या कपांवरील हट्टी डाग काढून टाकू शकता. कप स्वच्छ आणि चमकदार बनवू शकता.

Web Title: stubborn stain on tea cup will be cleaned in minutes with this one thing it will shine like mirror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.