Join us  

राजस्थानी मिरची वड्याची खास रेसिपी; पावसाळ्यात मिरची वडा नाही खाल्ला तर काय मजा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 3:49 PM

Stuffed Mirchi Pakoda Recipe : हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला जाड मिरच्यांची आवश्यकता असेल. बारीक मिरचीत स्टफिंग व्यवस्थित भरता येणार नाही आणि चवसुद्धा जास्त तिखट लागेल म्हणून कमी तिखट असलेल्या  मिरच्या निवडा.

वरण भात किंवा भाजी चपातीबरोबर भजी, कटलेट, चटण्या, पापड, वड्या असे पदार्थ खायला असतील तर जेवणाची मजाच काही वेगळी असते. मिरची भजी, बटाट्याची भजी, कांदा भजी असे अनेक पदार्थ तुम्ही ट्राय केलेच असतील. स्टफ मिरची भजी पण ट्राय करून पाहा.  (Easy Stuffed Mirchi Pakoda) स्टफ मिरची भजी हा पदार्थ तुम्ही पाव, चपाती किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता. या पदार्थाला मिरची वडा असंही म्हणतात. हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला जाड मिरच्यांची आवश्यकता असेल. बारीक मिरचीत स्टफिंग व्यवस्थित भरता येणार नाही आणि चवसुद्धा जास्त तिखट लागेल म्हणून कमी तिखट असलेल्या  मिरच्या निवडा. (Stuffed Mirchi Pakoda Recipe)

१) सगळ्यात आधी लांब, जाड पोपटी रंगाच्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्या. मिरच्या सुरीच्या साहाय्याने मधोमध, सरळ कापा.

२) स्टफ भजी बनवण्यासाठी एका उकडलेल्या बटाट्याचे बारीक काप करून घ्या. 

३) त्यानंतर त्यात लाल तिखट, मीठ, हळद, धणे पावडर, जीरे पावडर, आमसूल पावडर, कोथिंबीर घालून एकजीव करा. बटाट्याचा मोठा गोळा बनवून झाकून ठेवून द्या. 

४) एका बाऊलमध्ये बेसनाचं पीठ, हिंग, मीठ, ओवा, सोडा, बडीशेपेचे दाणे आणि पाणी घालून कोटिंगसाठी बॅटर तयार करा.

५) तयार बटाट्याचं स्टफींग मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरा. हे सारण बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या आणि दाबून  भरा.

६) मिरच्या बेसनाच्या पिठात घोळवून गरमागरम तेलात सोडा.  मिरच्यांचा रंग बदलल्यानंतर खमंग, कुरकुरीत भजी बाहेर काढा. तयार आहे गरमागरम मिरची वडा.

मिरच्या का खाव्यात?

हिरव्या मिरचीत व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. ही मिरची बीटा कॅरोटीनच्या गुणांनी परीपूर्ण असते. याशिवाय  यातील पोषक तत्व स्किन ग्लो करण्यास आणि एक टेक्स्चर सुधारण्यास मदत करतात. योग्य प्रमाणात मिरचीचे  सेवन केलेल तर पोटाचा अल्सर बरा होतो कारण मिरची शरीरातील गरमी वाढू देत नाही.

पोट खराब झाल्याने अनेकदा तोंड येण्याचा त्रास होतो. म्हणून हिरवी मिरची खायला सुरूवात करा. मिरची आयर्नचा एक नैसर्गिक स्त्रोत आहे. आयर्न शरीरातील रक्त प्रवाह व्यवस्थित करून त्वचा आणि केसांना सुंदर बनवते. यामुळे शरीर एक्टिव्ह आणि मेंदू शांत राहतो. आहारात थोडया फार प्रमाणात हिरव्या मिरचीचा समावेश करा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स