हिवाळयात थंडी आणि होणाऱ्या लहान मोठ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता मिळवून देणारे पदार्थ खाण्यावर अधिक भर दिला जातो. या पदार्थांमध्ये शेंगदाणे आणि गूळ (How To Make Healthy Peanut Jaggery Paratha At Home) हे दोन पदार्थ जास्त प्रमाणावर खाल्ले जातात. थंडीच्या दिवसांत (Winter Special Peanut Jaggery Paratha Recipe) शेंगदाणे गुळाची चिक्की - लाडू असे अनेक पदार्थ घरोघरी तयार केले जातात. परंतु यंदाच्या हिवाळ्यात शेंगदाणे गुळाचा वापर करुन नेहमीचे तेच ते पदार्थ तयार करण्यापेक्षा काहीतरी नवीन आणि वेगळं नक्की ट्राय करु शकतो(Stuffed Jaggery Peanut Paratha Recipe).
दाण्याचा कुटं आणि गूळ (How To Make Gud Mungfalli Roti) हे प्रत्येक घरात कायम जास्तीचे असतेच. हे दोन पदार्थ वापरून आपण शेंगदाणे गुळाचा झटपट होणारा गोड चविष्ट साजूक तुपातील पराठा करु शकतो. हेल्दी प्रोटीन रिच आणि हिवाळ्यात पोटभरीचा असा हा शेंगदाणे - गुळाचा पौष्टिक पराठा कसा करायचा ते पाहूयात.
साहित्य :-
१. शेंगदाणे - २ कप
२. गूळ - १ कप (किसलेला गूळ)
३. वेलची पूड - १/२ टेबलस्पून
४. गव्हाचे पीठ - २ कप
५. पाणी - गरजेनुसार
६. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून
पातळ आवरणाची भरपूर पदर सुटलेली खुसखुशीत मटार करंजी, हिवाळ्यात करायलाच हवा असा चमचमीत बेत...
मूठभर मूग-मूठभर उडीद-हिवाळ्यात खा पौष्टिक कुरकुरीत भजी! थंडीसाठी खास बेत-पाहा रेसिपी...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये शेंगदाणे घेऊन ते कोरडे भाजून घ्यावेत.
२. शेंगदाणे भाजून घेतल्यावर ते एका सुती कापडावर काढून घेऊन, हल्केच गरम असताना कापडाने चोळून त्यावरील सालं काढून घ्यावीत.
३. आता एका मिक्सरच्या भांड्यात भाजून सालं काढलेले शेंगदाणे घेऊन ते व्यवस्थित वाटून शेंगदाण्याचा कूट तयार करून घ्यावा.
४. शेंगदाणे हलकेच फिरवून त्याची भरड करून घेतल्यावर त्यात वेलची पूड, किसलेला गूळ घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून पराठ्याचे सारण तयार करून घ्यावे.
५. आता नेहमीप्रमाणे चपातीसाठी जशी कणीक मळून घेतो तशी कणीक मळून घ्यावी.
ताजी रसरशीत स्ट्रॉबेरी धुण्याची सोपी ट्रिक, ‘अशी’ ठेवा स्ट्रॉबेरी-आठवडभर राहील ताजी...
६. या मळून घेतलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यावेत. तयार गोळ्यांच्या बरोबर मधोमध हाताने दाब देत खोलगट आकार द्यावा.
७. आता या कणकेच्या खोलगट भागात तयार शेंगदाण्याचे सारण भरून घ्यावे व पुन्हा एकदा गोलाकार गोळा तयार करून घ्यावा.
८. पॅनला थोडेसे तूप लावून हा पराठा दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा.
हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी हाय प्रोटीन रिच शेंगदाणे - गुळाचा गोड पराठा खाण्यासाठी तयार आहे.