Lokmat Sakhi >Food > ना साखरेच्या पाकाचं टेंशन- ना गुळाचं, फक्त १० मिनिटांत करा खजूर रोल, रोज १ तुकडा-हाडं ठणठणीत

ना साखरेच्या पाकाचं टेंशन- ना गुळाचं, फक्त १० मिनिटांत करा खजूर रोल, रोज १ तुकडा-हाडं ठणठणीत

Sugar-Free Dates & Dry Fruit Roll : अनेकजण  वजन कमी करण्यासाठी तर काहीजण शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी साखर खाणं टाळतात. अशावेळी  हा शुगर फ्री चवदार पदार्थ एक उत्तम पर्याय आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 08:46 AM2023-08-07T08:46:00+5:302023-08-07T13:42:30+5:30

Sugar-Free Dates & Dry Fruit Roll : अनेकजण  वजन कमी करण्यासाठी तर काहीजण शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी साखर खाणं टाळतात. अशावेळी  हा शुगर फ्री चवदार पदार्थ एक उत्तम पर्याय आहे. 

Sugar-Free Dates & Dry Fruit Roll : Make Khajur dry fruit roll in just 10 minutes khajoor ki mithai | ना साखरेच्या पाकाचं टेंशन- ना गुळाचं, फक्त १० मिनिटांत करा खजूर रोल, रोज १ तुकडा-हाडं ठणठणीत

ना साखरेच्या पाकाचं टेंशन- ना गुळाचं, फक्त १० मिनिटांत करा खजूर रोल, रोज १ तुकडा-हाडं ठणठणीत

नाश्त्याला किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी काही पौष्टीक पदार्थ असेल पोट भरण्यासह पोषणही मिळतं. लहान मुलं जेव्हा ड्रायफ्रुट्स खायला नाक मुरडतात तेव्हा तुम्ही त्यांना हा टेस्टी पदार्थ बनवून देऊ शकता. (Sugar-Free Dates & Dry Fruit Roll) फक्त लहान मुलंच नाही सगळ्यांनाच भूकेच्या वेळी खाण्यासाठी हा भरभरून पोषण देणारा पदार्थ आहे. (Dry Fruit Barfi Recipe)

तब्येत चांगली राहावी यासाठी मेथीचे, डिंकाचे लाडू नेहमी खाल्ले जातात पण लाडू बनवणं म्हणजेच  खूपच वेळ खाऊ काम. अनेकांना वेळेअभावी लाडू बनवणं नकोसं वाटतं. अशावेळी फक्त 10 मिनिटात  ड्रायफ्रुट्स रोल बनवू शकता. (How to make dryfruit roll) अनेकजण  वजन कमी करण्यासाठी तर काहीजण शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी साखर खाणं टाळतात. अशावेळी  हा शुगर फ्री चवदार पदार्थ एक उत्तम पर्याय आहे. 

1) ड्रायफ्रुट्स रोल बनवण्यासाठी सगळ्यात आधी एक खजूराचं पॅकेट घ्या. खजूरातील बीया काढून  दोन भागांमध्ये चिरून घ्या. त्यानंतर हे खजूर मिक्सरला लावा. 

2) खजूर बारीक झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या. पिस्ता बारीक चिरून तव्यावर भाजून घ्या, त्यानंतर खसखस हलकी भाजून घ्या. भाजत असताना चमच्याने ढवळत राहा. अन्यथा पदार्थ करपू शकतो.  

3) नंतर कढईत बदामाचे काप, काजूचे काप, खरबूजाच्या बिया, कलिंगडाच्या बिया एकत्र परतवून घ्या. त्यानंतर एका कढईत तूप घाला. तूप वितळ्यानंतर त्यात खजूराचे काप घाला खजूराचे काप आणि तूप व्यवस्थित एकजीव करून घ्या. 

 

4) याचा बारीक गोळा तयार झाल्यानंतर चमच्यानं एकत्र करा. यात भाजून घेतलेले ड्रायफ्रुट्स घाला आणि मिश्रण एकजीव करा. ड्रायफ्रुट्स आणि खजूर व्यवस्थित एकसंध झाल्यानंतर  गॅस बंद करून मिश्रण एका ताटात काढा,  हाताला तूप लावून हा गोळा व्यवस्थित मळून लांब रोल तयार करा. 

5) तयार रोल खसखसमध्ये घोळवून घ्या आणि एका पेपरमध्ये रॅप करा. १० ते १५ मिनिटांनी हा पेपर काढून रोलचे आडवे बारीक काप करा. तयार आहे पौष्टीक ड्रायफ्रुट्स रोल.

Web Title: Sugar-Free Dates & Dry Fruit Roll : Make Khajur dry fruit roll in just 10 minutes khajoor ki mithai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.