दिवाळी(Diwali 2024) हा सणच आनंद आणि प्रसन्न करणारा असल्याने आपण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना काहीतरी भेटवस्तू देतोच. या भेटवस्तूंमध्ये शक्यतो मिठाया, ड्रायफ्रुटस यांचा समावेश असतो. दिवाळी सण म्हटला की आपण फराळासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ ताव मारुन खातो. दिवाळीत अनेक गोडाधोडाच्या पदार्थांसोबत मिठाया देखील आवडीने खाल्ल्या जातात. दिवाळीत आपण आपल्या जवळचे नातेवाईक मित्रमंडळी यांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत भेटवस्तू देतो(Sugar Free Dates & Wallnut Brfi).
या भेटवस्तू देताना नेमकी काय भेट द्यावी असा प्रश्न आपल्याला पडतो. खरतरं, मिठाया आणि ड्रायफ्रुट्स तर आपण भेट म्हणून देतोच. परंतु यंदाच्या दिवाळीला काहीतरी वेगळी भेट द्यायची असेल तर, आपण याच ड्रायफ्रुट्सचा वापर करून झटपट तयार होणारी शुगर फ्री अक्रोड - खजुराची हेल्दी मिठाई तयार करून भेट म्हणून देऊ शकतो. आपल्यापैकी बरेचजण ड्रायफ्रुटस खायचा कंटाळा करतात पण तेच या ड्रायफ्रुटसची मिठाई केली तर खाऊन लगेच संपवली जाते. अक्रोड - खजुराची शुगर फ्री बर्फी तयार करण्याची सोपी रेसिपी(How To Make Sugar Free Dates & Wallnut Brfi At Home For Diwali).
साहित्य :-
१. खजूर - १ कप २. अक्रोड - १ कप ३. तूप - २ ते ३ टेबलस्पून ४. खवा - २ टेबलस्पून
ना भाजणी - ना पीठ, नेहमीच्या चकलीला ट्विस्ट देत यंदाच्या दिवाळीत ट्राय करा शेजवान चिली चकली...
अंबानींच्या घरच्या लाडूंची व्हायरल चर्चा, पाहा ‘अंबानी लाडू’ करण्याची शाही रेसिपी, दिवाळी स्पेशल...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये अक्रोड घेऊन ते कोरडे ४ ते ५ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यावेत. २. अक्रोड भाजून घेतल्यानंतर ते एका डिशमध्ये काढून थोडे गार झाल्यावर सुरीच्या मदतीने त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. ३. आता एका पॅनमध्ये तूप घेऊन यात बिया काढून घेतलेले खजूर घालावेत. खजूर तुपात व्यवस्थित परतून घ्यावेत. ४. त्याच पॅनमध्ये पुन्हा थोडे तूप घेऊन बारीक करून घेतलेले अक्रोडचे तुकडे परतून घ्यावेत.
Diwali : यंदा दिवाळीत करा रतलामी शेव, घ्या परफेक्ट पारंपरिक रेसिपी - फराळाची वाढेल लज्जत...
५. अक्रोड भाजून झाल्यावर त्यातच खवा घालूंन हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर सगळ्यात शेवटी परतून घेतलेले खजूर देखील या मिश्रणात घालूंन सगळे मिश्रण एकत्रित करून ५ ते १० मिनिटे शिजवून घ्यावे. ६. आता एक कडा असलेल्या डिश किंवा ट्रेमध्ये तूप घेऊन ते डिशमध्ये पसरवून घ्यावे. ७. या तुपाने ग्रीस केलेल्या डिशमध्ये बर्फीचे तयार मिश्रण ओतून ते चमच्याने हलकेच दाबून व्यवस्थित सेट करून घ्यावे. मिश्रण गरम असतानाच चौकोनी आकारात बर्फी कापून घ्यावी. ८. सगळ्यात शेवटी यावरून ड्रायफ्रुटसचे काप किंवा अक्रोडाचे बारीक तुकडे भुरभुरवून घ्यावे.
अक्रोड - खजूराची हेल्दी बर्फी खाण्यासाठी तयार आहे.