नाश्त्याला काही नवीन खावंस वाटलं की घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही कुरकुरीत, खमंग स्नॅक्स बनवू शकता. मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा संध्याकाळी चहाबरोबर खाण्यासाठी हा नाश्ता एक उत्तम पर्याय आहे. हा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला जास्तवेळ पोट भरल्यासारखं वाटेल. (How to make sujii Bites) वाटीभर रव्यापासून खमंग, कुरकुरीत सुजी बाईट्स बनवण्याची रेसेपी पाहूया. (Instant Suji Cheese Balls)
साहित्य
300 ग्रॅम रवा
½ कप किसलेले चीज
¼ कप चिरलेला कांदा
1 टीस्पून चिली फ्लेक्स
½ टीस्पून जिरे
½ टीस्पून काळी मिरी पावडर
चवीनुसार मीठ
1-2 चमचे ताजी चिरलेली कोथिंबीर
650 मिली पाणी
कृती
१) सगळ्यात आधी कढईत पाणी गरम करून त्यात मीठ, चिरलेला कांदा घाला. त्यानंतर चिली फ्लेक्स, काळी मिरीपूड, कोथिंबीर आणि रवा घाला. रव्याचं मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.
तांदुळाची खिचडी खाऊन कंटाळलात, करा ज्वारीची पौष्टिक चविष्ट खिचडी! रेसिपी सोपी, मस्त मेजवानी
२) मिश्रण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घट्ट झाल्यानंतर एक भांड्यात काढून घ्या. त्यात चीझ किसून घाला आणि चपातीच्या पीठाप्रमाणे मळून त्याचे लहान लहान गोळे तयार करा. हे गोळे गरम तेलात तळून घ्या. तयार आहेत क्रिस्पी, क्रन्ची सुजी बाईट्स. हे बाईट्स तुम्ही सॉस, चटणी किंवा चिझ डिपसह खाऊ शकता.