बटाटे आपल्या प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात असतात. बटाट्यांचा वापर करून तुम्ही वर्षभर टिकतील असेल बटाट्याचे खमंग, कुरकुरीत पापड तयार करू शकता. अनेकजण बटाट्याशिवाय भाजी बनवत नाहीत. त्यांच्या रोजच्या जेवणात बटाट्याचा समावेश असतो. बटाट्याचे चिप्स खाण्याचे क्रेव्हीग्स दिवसभरात कधीही येतात. (How to make batata papad) बाहेरच्या पॅकेज्ड चिप्समध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं याशिवाय त्यात कोणतं तेल वापरलं जातं याबाबत कल्पना नसते. मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर बाहेरील पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही घरी बनवलेले हे चिप्स खाऊ शकता. (How to make Potato Papad at Home)
कृती
१) हे पापड बनण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात पाण्यात सोलून घेतलेल्या बटाट्याचे मध्यम आकाराचे काप घाला.
२) उकळलेल्या बटाट्याचे काप एका परातीत काढून मॅश करून घ्या. त्यात जीरं, चिली फ्लेक्स घालून मिश्रण करा.
३) एका प्लास्टीकच्या तुकड्याला तेल लावून त्यावर हा गोळा ठेवा आणि मध्यम आकाराचे पापड दाबून घ्या. हे पापड १ ते २ दिवस उन्हात सुकण्यासाठी ठेवा. सुकल्यानंतर गरम तेलात पापड तळून घ्या.