Join us  

Watermelon Kulfi: टरबुज कुल्फी! टरबूज गोड निघालं नाही तर फेकू नका करा मस्त गारेगार टरबूज कुल्फी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2022 7:23 PM

Watermelon Kulfi Recipe: हा कुल्फीचा सगळ्यात सोपा प्रकार... या उन्हाळ्यात हमखास करून बघा.. तुम्हाला आणि घरात सगळ्यांना नक्की आवडेल. 

ठळक मुद्देफक्त ३ पदार्थ वापरून ही कुल्फी तयार करता येते.

उन्हाळ्यात आपण भरपूर टरबूज आणतो. पण तो गोड निघालं तरच घरातले सगळे आवडीने खातात. नाहीतर अगोड टरबुजाला कुणी हातही लावत नाही. मग असं कमी गोड निघालेलं टरबुज नाईलाजाने वाया जातं. अशा पद्धतीने टरबूज वाया घालविण्यापेक्षा टाका त्यात थोडीशी साखर आणि करा ना त्याची मस्त गारेगार कुल्फी (Summer special Food).. टरबुज खायला नाही म्हणालेले सगळे लोक अगदी आनंदाने टरबुजाच्या या गोड, थंडगार कुल्फी (water melon kulfi) फस्त करतील..

 

टरबुजाची कुल्फी कशी करायची याची एक सोपी रेसिपी इन्स्टाग्रामच्याthechubbyfoodie36 या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आली आहे. फक्त ३ पदार्थ वापरून ही कुल्फी तयार करता येते. शिवाय कुल्फी तयार करण्यासाठी आपण कोणतेही केमिकल्स वापरत नाही. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच टरबुज कुल्फी खाण्याच आनंद लुटू शकतात.

 

कशी करायची टरबुज कुल्फी?- टरबुज कुल्फी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी टरबुजाच्या फोडी मिक्सरमधून काढा आणि त्याचा रस करून घ्या. टरबुजाच्या बिया मात्र काढलेल्या असाव्या.- टरबुजाचा रस गाळणीने गाळून घ्या.- त्या रसामध्ये चवीनुसार साखर आणि थोडे काळे मीठ टाका. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या.- चहासाठी आपण जे युज ॲण्ड थ्रो कप वापरतो त्या कपामध्ये हा रस ओता.- वरून ॲल्यूमिनियम फॉईल लावून कप झाकून टाका.- कपाच्या मधाेमध लाकडी काडी घाला.- आता हे कप फ्रिजरमध्ये ठेवा. ७ ते ८ तासात कुल्फी छान सेट होईल.

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.इन्स्टाग्राम