Join us  

Summer Specail : उन्हानं गळाल्यासारखं झालंय, प्या लिंबू -पुदिन्याचं एनर्जी ड्रिंक! झटपट चवदार हायड्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 6:38 PM

Summer Specail: उन्हानं गळपटल्यासारखं झाल्यास करा सरबताचा उपाय.. रिफ्रेश होण्यासाठी प्या लिंबू पुदिन्याचं हाइड्रेटिंग ड्रिंक

ठळक मुद्देफक्त 10 मिनिटात लिंबू पुदिन्याचं सरबत तयार होतं. लिंबू पुदिन्याच्या सरबतातून शरीराला आवश्यक ओलावा आणि ऊर्जा मिळते. त्वचेचा पोत सुधारण्यास, वजन कमी होण्यासा लिंबू पुदिन्याचं सरब त फायदेशीर ठरतं. 

Summer Specail: वाढत्या उन्हाच्या प्रभावानं थकल्यासारखं होणं, गळपटणं, त्राण नसणं, दुपारच्या वेळेस खूप सुस्ती येणं यास्वरुपाचे त्रास होतात. काम तर समोर असतं पण करण्याचा मूडच लागत नाही. अशावेळेस चहा प्याल्यास त्याचे दुष्परिणाम शरीरावर जाणवतात. त्यापेक्षा घरी उपलब्ध लिंबू आणि पुदिन्याचा उपयोग करुन लिंबू पुदिन्याचं रिफ्रेशिंग सरबत करता येतं. यामुळे शरीरातील ओलावा त्वरित वाढत असल्यानं त्याला हायड्रेटिंग ड्रिंक असंही म्हणतात.अवघ्या 10 मिनिटात हे सरबत तयार होतं आणि पुढच्या कामांना ऊर्जा देतं. उत्साहवर्धक लिंबू पुदिन्याचं सरबत करणं एकदम सोपं. 

Image: Google

लिंबू पुदिन्याचं सरबत 

लिंबू पुदिन्याचं सरबत करण्यासाठी 4 लिंबू, 20-25 पुदिन्याची पानं, 5-6 चमचे पाणी, 4 ग्लास पाणी, 4 आइस क्यूब्स आणि 1 मोठा चमचा जिरे पावडर घ्यावी. लिंबाच्या रसासोबत लिंबाचं साल थोडं किसून घ्यावं. हे सर्व साहित्य मिक्सरमध्य घालून फिरवून घ्यावं.  हे सरबत गाळून लगेच प्यावं.

Image: Google

लिंबू पुदिन्याचं सरबत प्याल्यास..

1.लिंबू पुदिन्याचं सरबत पिल्यानं शरीराला आवश्यक पाणी मिळतं.2. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकली जातात. 3. या सरबतानं उत्साह आणि ऊर्जा वाढण्यासोबतच आरोग्यास इतर फायदेही मिळतात. 4. पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. 5. त्वचा मऊसूत होते. 

Image: Google

6. रोगप्रतिकारशक्ती वाढते. 7. मुखदुर्गंधीची समस्या दूर होते. 8. त्वचेचा पीएच स्तर सुधारुन त्वचेचा पोत चांगला होतो. 9. घशाचा संसर्ग झालेला असल्यास तो कमी होतो किंवा घशाच्या संसर्गाचा धोका टळतो.10. शरीरातील फॅटस कमी होवून वजन कमी होतं. 

टॅग्स :अन्नआहार योजनावेट लॉस टिप्ससमर स्पेशल