Lokmat Sakhi >Food > समर स्पेशल: उन्हाळ्यामध्ये ताक म्हणजे वरदान, मठ्ठा असेल तर मग क्या बात है! पाहा रेसिपी

समर स्पेशल: उन्हाळ्यामध्ये ताक म्हणजे वरदान, मठ्ठा असेल तर मग क्या बात है! पाहा रेसिपी

Summer Special: Buttermilk Is A Boon In Summer, Mattha Recipe : ही साधी सोपी रेसिपी उन्हाळ्यासाठी आहे एकदम परफेक्ट. पोटाला मिळेल थंडावा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2025 08:15 IST2025-03-17T08:12:52+5:302025-03-17T08:15:01+5:30

Summer Special: Buttermilk Is A Boon In Summer, Mattha Recipe : ही साधी सोपी रेसिपी उन्हाळ्यासाठी आहे एकदम परफेक्ट. पोटाला मिळेल थंडावा.

Summer Special: Buttermilk Is A Boon In Summer, Mattha Recipe | समर स्पेशल: उन्हाळ्यामध्ये ताक म्हणजे वरदान, मठ्ठा असेल तर मग क्या बात है! पाहा रेसिपी

समर स्पेशल: उन्हाळ्यामध्ये ताक म्हणजे वरदान, मठ्ठा असेल तर मग क्या बात है! पाहा रेसिपी

उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त हायड्रेशनची गरज असते. शरीरातील पाण्याची पातळी सारखी कमी होत राहते. अशावेळी फक्त पाण्याने काम होत नाही. (Summer Special: Buttermilk Is A Boon In Summer, Mattha Recipe)तर विविध सरबतांची गरज असते. ज्यूस प्यायची गरज असते. नारळ पाणी प्यायला हवे. इतरही द्रव्य आपण पितो. आपल्याकडे रोज जेवणानंतर ताक पिण्याची पद्धत आहे. (Summer Special: Buttermilk Is A Boon In Summer, Mattha Recipe)कारण ताक हे शरीरासाठी फार पौष्टिक असते. पचनसंस्थाचं काम सुरळीत चालावं यासाठी ताकाची मदत होते. तसेच शरीराला गरजेची अशी सत्वेही ताकातून मिळतात.

ताकामध्ये जीवनसत्त्व बी१२ असते. कॅल्शियम असते. (Summer Special: Buttermilk Is A Boon In Summer, Mattha Recipe)तसेच ताकामध्ये फॉस्फरस असते. ताकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ताक हे पित्तशामक आहे. त्यामुळे शरीरातील पित्तदोष कमी होतो. शरीरातील उष्णतेचे प्रमाणही कमी होते. ताक थंड असते. अपचनाचा ही त्रास होत नाही. ताक शक्यतो रात्री पिऊ नये. सकाळी प्यावे. वजन कमी करण्यासाठी ताक पिणे हा उत्तम उपाय आहे. ताकाने पोट भरते. मात्र ताकामध्ये फॅट्स अगदीच कमी असतात. 

ताकापासून विविध पदार्थ तयार केले जातात. त्यापैकी उन्हाळ्यासाठी उत्तम असा पदार्थ म्हणजे मठ्ठा. ताकाला मस्त मसाला लाऊन गार केलेले ताक उन्हाच्या दिवसात प्यायल्याने पोटाला आधार मिळतो. 

साहित्य 
दही, जिरे पूड, मीठ, साखर, आलं, कोथिंबीर, हिरवी मिरची

कृती
१. एका भांड्यामध्ये दही घ्या. ताजे गोड दही वापरा, आंबट दह्याला मज्जा नाही. घुसळणीच्या मदतीने दही जरा पातळ करून घ्या. त्या दह्यामध्ये गरजे एवढे पाणी ओता. मठ्ठा तयार करण्यासाठी ताक जरा घट्टच वापरावे. त्यामुळे ताकाला चव छान येते. 

२. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं घ्या, कोथिंबीर घ्या. हिरव्या मिरचीचे तुकडेही घ्या. तुम्हाला जेवढं तिखट झेपेल तेवढीच मिरची वापरा. मिरची कच्चीच वारल्याने चवीला जरा उग्र लागू शकते. सगळं मिक्सरमधून वाटून घ्या. जाडसर पेस्ट तयार करा. 

३. आता तो वाटलेला मसाला ताकामध्ये टाका. वरतून थोडी कोथिंबीर चिरूनही टाका. त्यामध्ये थोडीशी साखर टाका. साखरेचा वापर तिखटपणा बाधू नये यासाठी करायचा असतो.  त्यामध्ये जिरे पूड घाला. मीठ घाला. सगळं छान घुसळून  घ्या. थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा. गार झाले की थंडगार मठ्ठ्याचा आस्वाद घ्या.

Web Title: Summer Special: Buttermilk Is A Boon In Summer, Mattha Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.