उन्हाळा सुरु झाला की मुलांना बाहेर खेळायला जायचे असते. खेळण्यात इतके गुंग असतात की, त्यांचे अगदी खाण्या-पिण्याकडे लक्ष नसते. (Coleslaw salad sandwich recipe)सतत त्यांना काही तरी वेगळे खायला हवे असते. सतत भाजी-पोळी खाऊन त्यांना वैताग येतो. काही तरी यम्मी, टेस्टी पदार्थ त्यांना खायला हवा असतो.(Holiday recipe for children) पण काहीतरी पौष्टिक आणि चवदार द्यायच असेल तर संपूर्ण भाज्यांनी बनवलेले हे सॅण्डविच आपण त्यांना खाऊ घालू शकतो. (Summer vacation snacks)मुलांना डब्यात किंवा सकाळच्या नाश्त्यात हा पदार्थ आपण देऊ शकतो. आपण यामध्ये सगळ्या भाज्या घालून हे बनवू शकतो. (Sandwich recipe for picky eaters)अगदी १० ते १५ मिनिटांत तयार होणारं हे सॅण्डविच आहे. यामध्ये आपल्याला ब्रेड शिजवण्याची देखील गरज पडणार नाही. (Quick sandwich for school holidays)यामध्ये आपण ब्राऊन ब्रेडचा वापर करु शकतो. ज्यामुळे आरोग्याला कोणतीही हानी होणार नाही. सकाळचा भरपेट नाश्ता देखील होईल. ज्यामुळे मुलांना लवकर भूक देखील लागणार नाही. भाज्यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि प्रोटिनमुळे मुलांचे आरोग्य सुधारेल. पाहूया सोपी रेसिपी.
शाळेला सुट्टी लागली की घरीच करा चोकोबार आइस्क्रिम! पाहा झटपट गारेगार रेसिपी, चव विकतपेक्षा भारी
मेयोनेज - ३/४ कप मस्टर्ड सॉस - १ चमचा मीठ - १ चमचा मिरपूड - १ चमचा साखर - दीड चमचा लिंबाचा रस - १ चमचा बारीक चिरलेली कोबी - १ वाटी बारीक चिरलेली जांभळी कोबी - १ वाटीगाजर - १ वाटी कांदा - १ वाटी हिरवी शिमला मिरची - १ वाटीलाल सिमला मिरची - १ वाटी ब्राऊन ब्रेड
कृती
1. सगळ्यात आधी मेयोनेज, मस्टर्ड सॉस, मीठ, मिरपूड, साखर आणि लिंबाचा रस घालून सॉस तयार करा.
2. आता त्यानंतर सगळ्या भाज्या व्यवस्थित धुवून एका मोठ्या बाऊलमध्ये घ्या. त्यात वरुन तयार केलेला सॉस घाला.
3. हे मिश्रण चमच्याने नीट एकत्र करुन घ्या. ब्राऊन ब्रेडच्या बाजूच्या कडा काढून घ्या. तयार मिश्रण ब्रेडवर नीट व्यवस्थित सेट करा.
4. वरुन ब्रेड लावून घ्या. ब्रेडचे सुरीने काप करुन सर्व्ह करा.
5. आपल्याला हवे असल्यास आपण या भाज्या शिजवून घेऊ शकतो. तसेच सॅण्डविचची चव आणखी वाढवण्यासाठी ब्रेडला आपण हिरवी चटणी, टोमॅटो सॉस लावू शकतो.