Join us  

बटाट्याचे चिप्स लालसर- काळे पडतात?८ खास टिप्स, पांढरेशुभ्र होतील वेफर्स-वर्षभर टिकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2024 12:22 PM

How To Make Perfect Potato Chips: बटाट्याचे चिप्स हळूहळू लालसर किंवा काळे पडतात, काही महिन्यांनंतर त्यांना वास येतो, असं तुमचंही होत असेल तर चिप्स तयार करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा. (potato chips recipe in marathi)

ठळक मुद्देबटाट्याचे चिप्स तयार करताना कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या टाळायच्या, याविषयीची माहिती

उन्हाळा सुरू झाला की घरोघरी वाळवण करायला सुरुवात होते. कुरडया, पापड्या, पळीपानं, बटाट्याचे चिप्स असे कित्येक पदार्थ मोठ्या हौशीने आणि वेळ देऊन केले जातात. हे पदार्थ छान जमून आले तर घेतलेल्या मेहनतीचा सगळा थकवा निघून जातो (potato chips recipe in marathi). पण पदार्थ जर बिघडला तर मात्र पुरता हिरमोड होतो. बटाट्याचे चिप्स तयार करताना अनेकींचा असा अनुभव आहे की चिप्स लालसर- काळ्या रंगाचे होतात (how to make perfect potato chips). तळल्यानंतर खूपच तपकिरी रंगाचे दिसतात. असं तुमच्याही चिप्सच्या बाबतीत होत असेल तर चिप्स तयार करताना कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या हे एकदा पाहून घ्या. (easiest method of making potato chips)

बटाट्याचे चिप्स तयार करण्यासाठी खास टिप्स

 

बटाट्याचे चिप्स तयार करताना कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या टाळायच्या, याविषयीची माहिती MadhurasRecipe या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूया...

खऱ्याखुऱ्या वयापेक्षा अधिक तरुण दिसण्यासाठी ६ मेकअप टिप्स, दिसाल जास्त सुंदर- आकर्षक

१. यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चिप्ससाठी आकाराने मोठा आणि काळपट रंगाचं जाडसर आवरण असणारा बटाटा घ्या. पिवळसर रंगाचं पातळ आवरण असणारा बटाटा घेऊ नका. कारण त्यामध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे चिप्स काळे- लाल पडतात.

२. बटाट्याची सालं काढल्यानंतर तो मोकळ्या हवेत ठेवू नका. तो लगेच पाण्यात पुर्णपणे बुडेल अशा पद्धतीने ठेवा. 

 

३. बटाट्याचे जेव्हा स्लाईस कराल तेव्हा ते अगदी पातळ करा. जाडसर स्लाईस सुकायला वेळ लागतो आणि दरम्यान त्यांचा रंग पिवळसर, काळसर होत जातो. बटाट्याच्या स्लाईस केल्यानंतर त्या थेट पाण्यातच पडतील अशा पद्धतीने किसा.

४. बटाट्याच्या स्लाईस ३ ते ४ वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवून घ्या. जेणेकरून त्यावरचं सगळं स्टार्च निघून जाईल.

घरगुती हेअर डाय बनविण्याची आजीबाईंची खास पद्धत- बघा पांढरे केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय

५. यानंतर स्लाईस ज्या पाण्यात आहेत, त्यातून तुरटी फिरवून घ्या. यामुळे चिप्सला कडकपणा येतो आणि ते काळे पडत नाहीत.

६. बटाट्याच्या स्लाईस जेव्हा पाण्यात उकळायला ठेवाल, तेव्हा त्या खूप जास्त शिजू देऊ नका. नाहीतर त्याचा तुकडा पडतो. बटाट्याच्या स्लाईस हातात घेऊन दुमडून पाहा. जर त्यांच्यात लवचिकता आली आणि सहज त्या दुमडल्या गेल्या तर त्या व्यवस्थित शिजल्या आहेत असे समजा आणि गॅस बंद करा.

७. बटाट्याचे चिप्स सुकवायला प्लास्टिकवर टाकू नका. एखाद्या सुती कपड्यावर टाका.

८. बटाट्याचे चिप्स उन्हात सुकवू नये. रुम टेम्परेचरवर किंवा पंख्याच्या हवेमध्ये सुकवावे.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीसमर स्पेशल