उन्हाळा सुरु झाला की, आपल्या डिहायड्रेशनचा त्रास होतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.(Cucumber Mint Chaas Recipe) शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण भरपूर प्रमाणात पाणी पितो. परंतु शरीराला फक्त पाण्याची आवश्यकता नसते. उन्हाळ्यात शरीराला विविध पेय, ज्यूस किंवा सरबतांची आवश्यकता असते. (Summer Health Drink for Stomach Pain)
या काळात आपण अधिक रसाळ आणि पाणीदार फळे देखील खातो. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ऊसाचा रस, नारळ पाणी, मोसंबीचा ज्यूस या सारखे पेय प्यायले जाते.(Cucumber Chaas for Bloating Relief) आपल्याकडे जेवल्यानंतर अनेकांना ताक पिण्याची सवय आहे. ताक हे शरीरासाठी फायदेशीर असते.(Mint Leaves Benefits for Digestion) पण बरेचदा दही किंवा दह्याचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला त्रास होतो. सर्दी-खोकल्यासारखे सामान्य आजार उद्भवतात. ताक प्यायल्याने पचनसंस्था सुरळीत होते. तसेच यातून शरीराला अनेक पोषकतत्व मिळतात. (Natural Remedies for Bloating with Cucumber Chaas)
आंबट-गोड कच्च्या करवंदाचं लोणचं, आजीच्या हातची चव हवी तर लक्षात ठेवा ३ टिप्स
ताक आपण नेहमीच पितो. पण जर आपल्याला वेगळ्या पद्धतीचे ताक तयार करायचे असेल तर काकडी आणि पुदिनापासून तयार करता येईल. काकडी आणि पुदिना हे पचनास चांगले असते. पुदीनामुळे पचनसंस्था शांत होते. तसेच पोटाला येणारी सूज किंवा गॅस यापासून आराम मिळतो. काकडी-पुदिन्याचे ताक कसे बनवायचे पाहूया सोपी रेसिपी.
साहित्य
दही - १ कप
काकडी- १
पुदिन्याची पाने - १० ते १२
कोथिंबीर
काळे मीठ - चवीनुसार
चाट मसाला - चवीनुसार
जिरे पावडर - आवश्यकतेनुसार
कृती
1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात काकडीचे तुकडे, पुदिन्याची पाने, कोथिंबीर, काळे मीठ, चाट मसाला आणि जिरे पावडर घालून वाटून घ्या.
2. आता एका बाऊलमध्ये दही चांगले फेटून घ्या. त्यात थोडे पाणी घालून पुन्हा चांगले फेटा.
3. यामध्ये तयार मसाला घालून चांगले ढवळून घ्या. काकडी-पुदिन्याचे ताक जेवल्यानंतर प्या.