उन्हाळा आला रे आला की मौसमी फळांचा हंगाम सुरु होतो. बाजारात रानमेव्याची पंगत पाहायला मिळते.(Easy Mango Dessert for Kids) या ऋतूमध्ये आंबे, फणस, कलिंगड, पपई, खरबूज-टरबूज,चिंच, बोर, कैरी अशा अनेक प्रकारच्या फळांची चव चाखायला मिळते. फळांचा राजा असणाऱ्या आंब्याला या काळात विशेष मागणी. या फळाची चव चाखण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागते. (Mango Sago Recipe for Kids)
आंब्याची चव फळ म्हणून तर चाखली जाते परंतु, शेक, ज्यूस, पन्ह, आइस्क्रिम अशा अनेक प्रकारे चव चाखली जाते.(Summer Desserts for Children) उन्हाळ्याची सुट्टी आणि आंब्याचा मौसम मुलांसाठी फार मज्जेशीर असतो. किती आणि कोणत्या प्रकारचे आंबे खाऊ असे मुलांना होते. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना आंबा आवडतो.(Creamy Mango Sago Pudding) बाजारात मँगो मस्तानी, आमरस, आंबा वडी, आंब्याचा पुलाव, आंब्याचा मुरंबा, गुळांबा, आंब्याचा केक असे अनेक पदार्थ आपण खाल्ले असतीलच.(Tropical Fruit Dessert Ideas) परंतु, आज आम्ही तुम्हाला मँगो सागो रेसिपी सांगणार आहोत. आंबा आणि साबुदाण्यापासून तयार केलेली ही खीर चवीला अगदी उत्तम. क्रिमी आणि यम्मी रेसिपी
बेसनाचा पोळा एकदम मऊमऊ-लूसलुशीत करण्यासाठी पिठात कालवा १ पदार्थ, पारंपरिक पोळा खा निवांत
साहित्य
आंबे - २
आंब्याचे काप - १ वाटी
ताडगोळ्याचे काप - १ वाटी
साबुदाणा - १/२ कप
कंडेन्स मिल्क - आवश्यकतेनुसार
दूध - १ कप
साहित्य
1. सगळ्यात आधी आंबे स्वच्छ धुवून त्याच्या फोडी मिक्समध्ये वाटून घ्या.
2. आता २ आंब्याच्या फोडींचे काप करा. ताडगोळा सोलून त्याचे देखील काप करा.
3. साबुदाणा ३ तास भिजवल्यानंतर एका भांड्यात त्याला १० मिनिटे शिजवून घ्या. यानंतर चाळणी ठेवून शिजवलेला साबुदाणा गाळून घ्या. वरुन थंड पाणी घाला.
4. आता एका बाऊलमध्ये आंबा आणि ताडगोळ्याच्या फोडी, आमरस, साबुदाणा आणि कंडेन्स मिल्क घाला. वरुन दूध घालून चांगले ढवळून घ्या.
5. २ तास फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा आंबा-साबुदाणा खीर किंवा मँगो सागो...